प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- आज जागतिक महिला दिनानिमित्त रासे गावात कर्मयोगी संस्थेच्या तळेगाव दाभाडे यांच्या माध्यमातून महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.तसेच भोसरी येथील अक्युयार्ड हॉस्पिटल मार्फत गावातील नागरिकांना आरोग्य कार्ड वाटप करण्यात आले. या कार्डचा फायदा गावातील नागरिकांना होणार आहे. यावेळी शिबिराला गावातील अनेक महिला उपस्थित होत्या.

जागतिक महीला दिन हा प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. यावेळी समाजात नाविन्यपूर्ण काम करण्याऱ्या व संकटांशी लढा देणाऱ्या स्त्री सन्मान शासनाकडून व सामाजिक संस्थेकडून केला जातो. आज या दिनाचे औचित्य साधुन कर्मयोगी संस्थेच्या मार्फत रासे गावात महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी महिलांची होमोग्लोबिन, डोळे, रक्तदाब,वजन, उंची तपासणी करून आरोग्य सल्ला यावेळी डॉक्टरांकडुन गावातील महिलांना देण्यात आला. तसेच भोसरी येथील अक्युयार्ड हॉस्पिटलकडुन गावातील नागरिकांना आरोग्य हेल्थ कार्डचे वाटप यावेळी करण्यात आले.या कार्डचा याचा फायदा नागरिकांना हॉस्पिटलमध्ये घेता येणाऱ्या उपचारासाठी 1 वर्ष घेता येणार आहे.यावेळी गावातील अनेक महिला, व जेष्ठ महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

या कार्यक्रमाला रासे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक सौ खरपुडे मॅडम, सरपंचकिरण ठाकर, भाजप नेते सूर्यकांत मुंगसे, ग्रामपंचायत महिला सदस्य ,आरोग्य सेविका ,अनिता शिंदे, आशा काळे, अंगणवाडी सेविका कारंडे, झिंजुरके मॅडम,
अक्युयार्ड हॉस्पिटलचे सोमनाथ शिंदे,डॉ गवळी,विपुल शिंदे व अनेक महिलांनी उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतला.
