स्वराज्य वार्ता प्रतिनिधी
मुंबई :- आज भामा आसखेड व चासकमान पुनर्वसन बाधित शेतकरी यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत आमरण उपोषण चालू केले आहे.आज उपोषणाचा पहिला दिवस झाला आज पहिल्या दिवशी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी भेट दिली.
तरी सर्व बाधित शेतकरी यांचे हक्काचे पाणी पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना दिले. परंतु शेतकऱ्याच्या जागा भू माफिया द्वारे लाटण्यात आल्या. यामुळे शेतकऱ्यानी पवित्र आक्रमक पवित्रा घेतला आहे असुन 😢पाणी नाहीतर जागा नाही अशी मागणी आता केली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून भामा आसखेड व चासकमान पुनर्वसन बाधित शेतकऱ्यांचे प्रश्न उभे असुन न्याय मिळण्यासाठी वेळोवेळी आंदोलने केली जात आहेत. शेतकऱ्यांनी रास्ता रोको, जलसमाधी, उपोषण करून देखील अजुन कोणत्याही सरकार कडुन त्यांचा प्रश्न सोडवला नाही का त्यांना पाणी मिळाले नाही. आता शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटल्याने आर नाहीतर पारची लढाई शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. त्यासाठी मुंबई येथे आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू केले असुन खालील मागण्या शेतकऱ्यांनी सरकार पुढे मांडल्या आहेत.

१)खेड तालुक्यातील नाणेकरवाडी , चाकण, गोणवडी, कडाचीवाडी,रासे,भोसे, खराबवाडी, काळूस, मेदनकरवाडी येथील जागा कालव्याद्वारे पाणी देणार म्हणून संपादित केल्या परंतु तिथे आजपर्यंत पाण्याचा एक थेंब सुद्धा मिळाला नाही. तेथील शेतकऱ्यांनी पाणी नाही तर जागा नाही असा पवित्रा घेतला असून. तेथील शेतकऱ्यांनी ताबा दिला नसून त्या सर्व जागा कलम ४८(१) नुसार शासनाने त्वरित पुन्हा मूळ शेतकऱ्याच्या नावे करण्यात याव्यात.