प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- आपल्या विविध मागण्यासाठी राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी बेमुदत संप पुकारला होता. गेल्या काही दिवसांपासून न्याय मिळण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी मुंबई येथे आझाद मैदानावर धरणे आंदोलन केले होते. यामध्ये अनेक अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या.आता सत्तेवर आलेल्या शिंदे सरकारने त्यांचे मागणी मान्य करून मानधनात 1500 रुपयांची व सेवा समाप्तीनंतर पेन्शन योजना चालू करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे सेविकांच्या संघटनेने पुकारलेला संप अखेर मागे घेतला आजपासुन अंगणवाडी शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत.

अंगणवाडी सेविकांनी पुकारलेल्या या संपाचे पडसाद सध्या चालू असलेल्या विधान सभेच्या अधिवेशनात विरोधकांनी मांडला होता।.याला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सेविकांच्या मानधनात 1500 रुपयांनी व सेवा समाप्तीनंतर पेन्शन दिली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. याचा फायदा हा राज्यभरातील 2 लाख अंगणवाडी सेविकांना होणार आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी पुकारलेल्या संप अखेर मागे घेण्यात आला असुन अंगणवाडी शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून शाळा बंद असल्याने विध्यार्थ्यांच्या शिक्षणाचे नुकसान झाले होते. त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी संप करताना विद्यार्थ्यांच्या शिक्षण बंद होणार नाही याची काळजी घेऊन संप करण्याची अपेक्षा पालक वर्गातून केली जात आहे.