शेतकऱ्यांना रब्बी हंगामात बियाणे व खतांचा वेळेत पुरवठा करा-षन्मुगराजन एस.

रब्बी हंगाम पूर्वतयारी आढावा बैठक

प्रतिनिधी फुलचंद भगत :-


वाशिम : रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पेरणीसाठी बियाण्यांची आणि खतांची अडचण निर्माण होणार नाही तसेच शेतकऱ्यांच्या याबाबत तक्रारी येणार नाही याची दक्षता घेवून बियाणे व खतांचा वेळेत पुरवठा करा. असे निर्देश जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. यांनी दिले.


दि. 8 नोव्हेंबर रोजी रब्बी हंगाम पूर्वतयारी आढावा सभा जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस.यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली.

यावेळी ते बोलत होते. सभेला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, प्रभारी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक सुर्यकांत फाळके, महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक डॉ.प्रशांत घावडे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सरव्यवस्थापक व्ही.एम.सरनाईक, जिल्हा परिषदेचे मोहिम अधिकारी सी.पी.भागडे,कृभकोचे मार्केटिंग व्यवस्थापक डी एम. सुर्यवंशी, जिल्हा उपनिबंधक यांचे प्रतिनिधी पी.टी. सरकटे, आरसीएफचे उपप्रबंधक एस.बी वैनदेशकर, तंत्र अधिकारी डी.ए. कंकाळ व एस.एम. मकासरे यांची उपस्थिती होती.रब्बी हंगामात शेतकऱ्यांना घरचे बियाणे वापरण्यासाठी कृषी विभागाने प्रोत्साहीत करावे असे सांगून श्री. षन्मुगराजन म्हणाले, महाबीजने रब्बी हंगामात बियाण्यांचा तुटवडा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. किटकनाशकांचा पुरेशा प्रमाणात पुरवठा करावा. धुके पडले तर तुरीवर आलेल्या किडीचा नायनाट करण्यासाठी कोणत्या किटकनाशकांची शेतकऱ्यांनी फवारणी करावी याबाबत कृषी विभागाने वेळोवेळी मार्गदर्शन करावे.

लोकप्रतिनिधीच्या उपस्थितीत त्यांच्या क्षेत्रात जावून किटकनाशक फवारणीचे प्रात्याधिक दाखवावे. रब्बी हंगामात पिक कर्ज वाटपासाठी बँकांनी मेळावे घ्यावे. असे त्यांनी सांगितले.श्री. तोटावार म्हणाले, महाबीजचे बियाणे खरेदी करण्यासोबतच काही खाजगी कंपन्यांचे संशोधीत बियाणे खरेदी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. जिल्ह्यात रब्बी पिक लागवडीचे क्षेत्र सर्वसाधारणपणे 82 हजार हेक्टर इतके आहे. यावर्षीचे नियोजीत रब्बी हंगामाचे क्षेत्र 1 लाख 3 हजार 600 हेक्टर आहे. यामध्ये गहू, ज्वारी, मका, हरबरा, करडई पिकांचा समावेश असून 35 हजार हेक्टरवर गहू आणि 65 हजार हेक्टर क्षेत्रावर हरबरा पिक लागवडीचे नियोजन असल्याचे सांगितले.

यावर्षी 65 टक्के बियाणे घरगुती वापरण्याचे नियोजन करण्यात आल्याचे सांगून श्री. तोटावार म्हणाले, जिल्ह्यात युरीया, डीएपी. एमओपी, एसएसपी, संयुक्त व मिश्र खतांचा 25 हजार 230 मे. टन साठा उपलब्ध असून आतापर्यत 6 हजार 17 मे. टन खतांची विक्री करण्यात आली. जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी 33 हजार 927 क्किंटल बियाणे उपलब्ध असल्याची माहिती श्री तोटावार यांनी दिली.डॉ. घावडे म्हणाले, रब्बी हंगाम सुरु झाला असून महाबीजच्या बियाण्यांचा तुटवडा जाणवणार नाही. महाबीजचे बियाणे शेतकऱ्यांना अनुदानात उपलब्ध करुन देण्यात येतात. महाबीज व अन्य कंपन्यांच्या बियाण्यांच्या किंमतीत थोडाफार फरक असल्याचे सांगितले.सन 2021-22 च्या रब्बी हंगामात 75 कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले असून आतापर्यांत 11 कोटी रुपये पीक कर्ज वाटप करण्यात आल्याचे श्री. फाळके यांनी सांगितले.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!