एसटी चा संप,खासगी ट्रॅव्हल,कॅब कडून प्रवाशांची लूट,तिप्पट ते चोपट भाडे वाढ

पुणे वार्ता:- राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करा. या तसेच इतर अनेक प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील एसटी कामगार संघटनांनी संप पुकारला आहे. एसटी कामगार संघटना आणि राज्य सरकार यांच्यात बोलणी सुरू आहे. मात्र, त्याचा सर्वाधिक फटका पुणे, मंबईतून, नाशिक, तसेच विविध शहरातून दिवाळीनिमित्त गावाकडे गेलेला नागरिकांना बसत आहे.

आज पुणे जिल्ह्यात नारायणगाव, राजगुरूनगर ,इंदापूर या तीन आगारात एसटीचा १०० टक्के संप झाला
तर अनेक डेपोंमध्ये तिकीट रिसर्वेशनचे पैसे परत देण्यास सुरूवात केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा हा संप खाजगी वाहतूकदारांच्या पथ्यावर पडला असून खाजगी वाहतूक दारांकडून प्रवाश्यांची अक्षरशः भरमसाठ लूट सुरू आहे. ह्यांच्यावर भाडे बाबतीत कोणत्याही प्रकारचे नियंत्रण दिसत नाही.ज्याचा त्याचा सध्या मनमानी कारभार चाललेला दिसून आले आहे.

संग्रहित छायाचित्र


खासगी ट्रॅव्हल्स, कॅब वाल्यांनी याचा भरपुर प्रमाणात गैरफायदा घेत गाडीभाड्यात तब्बल तिप्पट-चौपट दर केले आहे. अगदी प्रशासनचे सुद्धा ह्यांच्याकडे लक्ष नाही की कोणत्याही प्रकारची नियमावली नाही, की भाडे बाबाबती नियंत्रण नियोजन शून्य कारभार चालला आहे ह्याचा थेट फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे.

पुणे शहर आणि जिल्ह्यातील नारायणगाव आणि खेड (राजगुरूनगर) वगळता अन्य सर्व आगारामधून नियमितपणे गाड्या सुरू होत्या. बाहेरूनही अनेक गाड्या प्रवाशांनी भरून येत होत्या. तर पुणे स्टेशन, शिवाजीनगर आणि स्वारगेट आगारातून एसटी वाहतूक सुरू होती. एसतीची संख्या कमी असल्याने येथे मोठ्या संख्येने प्रवाश्यांनी गर्दी केली होती. पुणे, मंबईतून दिवाळीनिमित्त गावाकडे गेलेला नागरिक पुन्हा मुंबई-पुण्याकडे परतू लागले आहेत. परंतु एसटीच नसल्याने त्यांना खाजगी बसचा पर्याय निवडावा लागत आहे. तर या संपाचा गैरफायदा घेत खाजगी वाहतूक दारांनी गाडीभाड्यात तिप्पट-चौपट वाढ केली आहे.

संग्रहित छायाचित्र

खासगी ट्रॅव्हल्सचे वाढीव दर

पुणे ते मुंबई ६०० ते ८००

पुणे ते औरंगाबाद ७०० ते ९०० रूपये

पुणे ते नागपूर १५०० ते १८०० रूपये

शिवाजीनगर ते अमरावती १३०० ते १५०० रूपये

पुणे ते उस्मानाबाद ९०० ते ११०० रूपये

पुणे ते लातूर१००० ते १२०० रूपये

पुणे ते बीड ८०० ते १००० रूपये

पुणे ते वर्धा १००० ते १२०० रूपये

पुणे ते नाशिक ५०० ते ७०० रूपये

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!