दर्यापूर – प्रतिनिधी महेश बुंदे :-
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या दर्यापूर आगारातील चालक, वाहक, व यांत्रिकी पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांनी दि. ७ नोव्हेंबर २०२१ पासून बेमुदत संप पुकारला आहे.

वेतन आणि इतर मागण्यांसाठी या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना याचा मोठा फटका बसला. यातून नेहमी असलेली दरवळ एका-एकी शांत झाली, लालपरीची चाके धावता-धावता थांबली असल्याचे चित्र दिसून येत आहे.
