संत गाडगेबाबा यांच्या दससूत्री कार्यक्रमा अंतर्गत अनाथ अपंग आदीवासीयांची दिवाळी साजरी व्हावी याकरिता दर्यापूरातील विविध प्रतिनिधी संस्था प्रमुख यांच्या वतीने एक करंजी दोन लाडू अनाथ अपंग आदिवाशांसोबत नाते जोडू उपक्रमा अंतर्गत वाटपाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ आज दि. ८ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ९ वाजता आमला येथील पारधी पाडा येथे पार पडला.
आमदार श्री बळवंत वानखडे यांच्या हस्ते तर जिल्हा बँक अध्यक्ष श्री सुधाकर भारसाकळे यांच्या अध्यक्षतेखाली तर ऍड अभिजित दादा देवके, संजू भाऊ बेलोकार, जेष्ठ पत्रकार गजाननराव देशमुख, शिवसेना तालुका प्रमुख गोपाल पाटील अरबट, शशांक धर्माळे, क्रीडा शिक्षक संतोष मिसाळ, तुळशीदासजी धांडे, संदीप पाटील अरबट, युवा एकता सामाजिक संघटनेचे अध्यक्ष दत्ता पाटील कुंभारकर, राष्ट्रवादीचे मुकेश डाहेकर आमला, इंजि. नितेश वानखडे अमोल देशमुख, अनिल भोरडे आदींच्या प्रमुख उपस्थितीत दिवाळी फराळ वाटण्यात आला. त्यानंतर चण्डिकापुर येथील पारधी वस्तीत करण्यात आला यानंतर भराळी वस्ती लेहगाव, धामना तोंगलाबाद येथील पारधी वस्ती व बनोसा येथील पारधी वस्तीमधील आदिवासी कुटुंबाना वाटप करण्यात येणार असल्याचे गाडगे बाबा बालगृह आश्रमाचे संचालक गजाननराव देशमुख यांनी जाहीर केले त्याप्रसंगी बालगृहाचे हर्षल कपले, आदित्य अंभोरे, चंदन पतीगे, राहुल ठाकरे, हरकेश बकोडीया, आयुष अरबट आदींनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमाला संजू पाटील भारसाकळे, रफिक भाई घाणीवले, ज्ञानेश्वर घाटे अमरावती, श्री भागवतकर साहेब अमरावती, पुरोहित बिकानेर स्वीट सेंटरचे संचालक धनसीन राज पुरोहित आदींचे सहकार्य लाभले.