प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- गेल्या अनेक वर्षांपासून सरकारकडे केलेल्या मागण्या पुर्ण न झाल्याने पुन्हा एकदा अंगणवाडी सेविकांनी राज्यभर संप पुकारला आहे. या संपामध्ये अनेक अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या असुन 3 4 दिवसांपासून शाळा बंद असल्याने विध्यार्थ्यांच्या शिक्षणाचे हाल होताना दिसून येत आहे.

अंगणवाडी सेविकांचे अनेक प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. कोणत्याही सरकारकडून त्याची दखल घेतली जात नसल्याने पुन्हा न्याय मिळण्यासाठी राज्यभरातील अनेक अंगणवाडी सेविका रस्त्यावर उतरल्या आहेत.त्यांच्या पोषण आहार ट्रेकर हा मराठीत करावा, मानधनात वाढ करावी, पेन्शन योजना लागू करावी, व नवीन मोबाईल अंगणवाडी सेविकांना देण्यात यावा या मागण्या त्यांनी सरकारकडे मांडल्या आहेत.त्यामुळे अनेक अंगणवाडी सेविका संपामध्ये सहभागी झाल्या असुन गेल्या 3 दिवसांपासून शाळेला सुट्टी देण्यात आली आहे. यामुळे विध्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर मोठा परिणाम होनार आहे.त्यामुळे आता राज्य सरकारकडुन कोणती पाऊले उचलली जाणार का अंगणवाडी सेविका संप मागे घेणार हेच पाहावे लागेल.