प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- चाकण येथील श्री चक्रेश्वर मंदिरात येणाऱ्या महाशिवरात्रीला शिव-पार्वतीचा विवाह संपन्न होणार असल्याची माहिती मंदिराचे पुजारी यांनी स्वराज्य वार्ता चॅनेलशी बोलताना दिली.या विवाह सोहळ्याची जय्यत तयारी सुरू केलेली पाहायला मिळत आहे.

श्री चक्रेश्वर मंदिरात महाशिवरात्रीचे महापर्व सुरू असल्याने अनेक कार्यक्रम व कीर्तन भक्तांसाठी देवस्थान ट्रस्टकडुन आयोजित करण्यात आले.त्यामुळे सगळीकडे भक्तिमय वातावरण दिसून येत आहे. परिसरातील अनेक भोलेनाथ भक्त भगवान शिव शंकराच्या दर्शनासाठी येत असतात.येथील भगवान शंकराची पिंड पुरातन काळापासून अस्थिवात असुन अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. महाशिवरात्रीच्या अगोदर शिव पार्वतीचा साखरपुडा समारंभ अष्टमीघ्या दिवशी 14 फेब्रुवारी 2023 रोजी मोठ्या थाटात पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते.

भगवान शंकराचा हळदीचा कार्यक्रम पार पडला असुन हिंदु धर्मातील शास्रनुसार विवाह ज्या पद्धतीने पार पडला जातो त्याप्रमाणे भगवान शंकर पार्वतीचा विवाह पार पडणार असल्याचे पुजारी यांनी सांगितले. लवकरच येत्या महाशिवरात्रीला विवाह सोहळा संपन्न होणार असुन याची जय्यत तयारी देवस्थान कडून सुरू असल्याची पाहायला मिळत आहे.
