ग्रामसेवक भरती फॉर्म भरण्याआधी तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे की ग्रामसेवक भरतीसाठी वयाची अट किती असते. शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार ग्रामसेवक भरतीसाठी कमीत कमी वय 18 वर्षे तर जास्तीत जास्त 38 वर्षे असणे आवश्यक असते. यापेक्षा कमी किंवा जास्त असल्यास तुम्ही अर्ज करू शकत नाही.
सूचना : उमेदवार इतर प्रवर्गातील असेल तर 38 वर्षापेक्षा वय जास्त नसावे परंतु आरक्षित प्रवर्गातील असेल तर शासन नियमानुसार 3 किंवा 5 वर्ष सूट असू शकते.
1) 31 जानेवारी 2023 पर्यंत बिंदू नामवली अंतिम करून संवर्गनिहाय आरक्षण गरज भासल्यास कंपनीची निवड करणे.
2) 1 ते 7 फेब्रुवारी 2023 पर्यंत भरतीसाठी जाहिरात काढणे.
3) 18 ते 22 फेब्रुवारी 2023 पर्यंत उमेदवारांकडून अर्ज मागवणे.
4) 23 फेब्रुवारी ते 1 मार्च 2023 पर्यंत उमेदवारांची अर्जाची इच्छा नाही करणे.
5) 2 मार्च ते 5 मार्च 2023 दरम्यान पात्र उमेदवारांची यादी जाहीर करणे.
6) 6 मार्च ते 5 एप्रिल 2023 जिल्हा परिषद व जिल्हा निवड समितीने मंडळांनी प्रत्यक्ष परीक्षेच्या आयोजना संदर्भात कार्यवाही करणे.
7) 06 ते 13 एप्रिल 2023 पात्र उमेदवारांचे प्रवेश पत्र तयार करून संबंधित उमेदवारांना उपलब्ध करून देणे.
8) 14 ते 30 एप्रिल 2023 परीक्षेचे आयोजन ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने करणे.
9) 01 ते 31 मे 2023 नियुक्ती अंतिम निकाल जाहीर करणे व पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश देणे.
ग्रामसेवक भरती पात्रता? ही उमेदवार कमीत कमी बारावी पास असणे आवश्यक आहे तर कोणत्याही शाखेतील पदवी असावी.