फुरसुंगी भेकराईनगर उरुळी देवाची हा भाग कचरा डेपो बाधित आहे. हवा पाणी प्रदूषित असल्या कारणाने येथील स्थानिक जनता अनेक वैद्यकीय समस्यांनी ग्रासलेले आहेत. तसेच फुरसुंगी प्राथमिक आरोग्य केंद्र हे जिल्हा परिषदेकडे असल्याने हा भाग पुणे मनपात समाविष्ट झाला आहे. तसेच या ठिकाणची कर्मचारी संख्या अपुरी आहे.
याबाबत योग्य निर्णय घेऊन फुरसुंगी भेकराईनगर उरुळी देवाची परिसरासाठी सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध असलेले 100 बेड चे इमर्जन्सी सर्विसेस, ओपीडी, औषधे, लॅब, ईसीजी, एक्स-रे , सोनोग्राफी, ऑक्सीजन ,व्हेंटिलेटर ,ऑपरेशन थिएटर अशा अद्यावत सुविधा असलेले हॉस्पिटल उभारणेसाठी निधी उपलब्ध करून द्यावा व फुरसुंगी गाव गांधनखळा , फुरसुंगी तुकाई टेकडी किंवा उरुळी देवाची मंतरवाडी येथे हे अद्यावत हॉस्पिटल उभारावे. अशी मागणी चंद्रकांत पाटील पालकमंत्री पुणे जिल्हा, तसेच उपसंचालक आरोग्य सेवा, पुणे मंडळ यांच्याकडे धनंजय कामठे अध्यक्ष भाजपा मध्य हवेली तालुका, मंगेश जाधव सरचिटणीस भाजपा मध्य हवेली तालुका, संदीप परदेशी सरचिटणीस युवा मोर्चा मध्य हवेली तालुका यांनी केली आहे.