प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- रासे येथील गायरान जमिनीवर होणाऱ्या कचरा डेपोला रासेकर ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला आहे. आज प्रजासत्ताक दिनी झालेल्या ग्रामसभेत चाकण नगरपरिषदेचा निषेध करत आंदोलन करण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांकडून देण्यात आला.

रासे गावातील गट नं 244 मधील गायरान जमिनीवर चाकण नगर परिषदेने कचरा डेपोसाठी मागणी केली आहे. मात्र या कचरा डेपोमुळे रासे गावातील पर्यावरणाला मोठे नुकसान होणार आहे. व गावातील एकमेव पाण्याचा स्रोत असलेला गावचा पाझर तलाव यामुळे पाणी दूषित होऊन अनेक रोगांचा सामना भविष्यात ग्रामस्थांना करावा लागेल.या गंभीर समस्यांना सामोरे न जाण्यासाठी रासेकर ग्रामस्थांनी कचरा डेपोला कडाडून विरोध केला आहे.आज झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला।.यांचे पत्र प्रशासनाला व पिंपरी चिंचवड आयुक्तांलायला देणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.