भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय, चाकण येथे महाराणा प्रताप यांची ४२६ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. भाजपा चाकण शहर, भाजपा युवा मोर्चा चाकण शहर, युवा वॉरियर्स, मा. अतुलभाऊ देशमुख विचार मंच, महाराणा प्रताप मित्र मंडळ व महाराणा प्रताप प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ही पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
“गुरु गोविंदसिंग, महाराणा प्रताप व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळेच भारताचे इतिहास व भूगोल सुरक्षित राहीला. चिनच्या भिंतीप्रमाणे पंजाब मधील शिख साम्राज्य, राजस्थान मधील राजपूत साम्राज्य व महाराष्ट्रातील मराठा साम्राज्य यांनी भारताचे परकीय आक्रमणापासून संरक्षण केले.” असे प्रतिपादन ॲड प्रितम शिंदे यांनी केले. करणी सेना महाराष्ट्र राज्य प्रवक्ते दिनेश जाधव यांनी महाराणा प्रताप व छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आपल्या अमोघ वाणीने वर्णन केला. भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडी जिल्हाध्यक्ष गुलाब खांडेभराड यांनी भक्ती व शक्ती हे एकमेकांच्या हातात हात घालून वावरता असल्यानेच भारत देशाचा इतिहास व झेंडा सुरक्षित राहीला आहे असे सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदेश जाधव यांनी केले तर आभार दत्तात्रय परदेशी यांनी मानले. या कार्यक्रमाचे आयोजन श्रीकांत परदेशी, रवि परदेशी, संतोष परदेशी यांसह इतर कार्यकर्ते यांनी केले. यावेळी भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडी जिल्हाध्यक्ष गुलाब खांडेभराड, भाजपा व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष मनोज मांजरे, करणी सेना महाराष्ट्र राज्य प्रवक्ते दिनेश जाधव, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गौतम वाघमारे, भाजपा तालुका संघटन सरचिटणीस व चाकण शहर प्रभारी अध्यक्ष ॲड प्रितम शिंदे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस संदेश जाधव, भाजपा युवा मोर्चा चाकण शहर अध्यक्ष प्रतिक गंभीर, भाजपा चाकण शहर सरचिटणीस अर्जून बोऱ्हाडे, भाजपा चाकण शहर सरचिटणीस अरुण जोरी, भाजपा चाकण शहर माजी अध्यक्ष अजय जगनाडे, भाजपा चाकण शहर उपाध्यक्ष मनोज बिसणारे, भाजपा सांस्कृतिक आघाडी चाकण शहर अध्यक्ष पंढरीनाथ सुतार, भाजपा कामगार आघाडी चाकण शहर उपाध्यक्ष संतोष भोज, भाजपा चाकण शहर उपाध्यक्ष जयदेवसिंग दुधानी, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा चाकण शहर अध्यक्ष बाबा जगताप, भाजपा ओबीसी युवा मोर्चा खेड तालुका अध्यक्ष किरण टिळेकर, युवा वॉरियर्स दत्तात्रय परदेशी, श्रीकांत परदेशी, रवि परदेशी, संतोष परदेशी यांसह अतुलभाऊ देशमुख विचार मंच व महाराणा प्रताप मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.