
महात्मा फुले ब्रिगेड पुणे जिल्हा अध्यक्षपदी दत्ता शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय माळी व सरचिटणीस उत्तम गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली. निवडीनंतर शिंदे म्हणाले महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहचविणार असून माळी समाजाला भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यावेळी त्यांनी संपूर्ण पुणे जिल्हा प्रवास करुन प्रत्येक तालुक्यात संघटन करणार असल्याचे सांगितले. तसेच समाजातील विविध स्तरांतून वेगवेगळ्या आघाड्यांवर पदाधिकारी नेमण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.