प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :-अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या महत्त्वपुर्ण पुणे-नाशिक रेल्वेच्या भूसंपादनासाठी खेड तालुक्यात गावोगावी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका चालूं आहे.आज खेड तालुक्यातील रासे गावात देखील पुणे नाशिक रेल्वे संदर्भात शेतकऱ्यांची बैठक संपन्न झाली.. यावेळी रेल्वेचे अधिकारी व गावातील शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या केंद्र शासनाच्या रेल्वे प्रकल्पाला रासे गावातील शेतकऱ्यांनी खुशीने दुजोरा दिला आहे.यावेळी प्रकल्पाची संपूर्ण माहिती रेल्वे अधिकारी यांनी शेतकऱ्यांना दिली. परंतु काही महसूल विभागाच्या प्रश्नावर अधिकारी यांना उत्तर देता न आल्याने बैठक महसुल अधिकारी यांच्या उपस्थित पुन्हा भरविण्याचे निवेदन यावेळी देण्यात आले.

यावेळी शेतकऱ्यांनी रेडीनेकर दर, व रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूकडून 5 मीटर रस्ता वाढविण्याची मागणी केली. तसेच गावातील शेतकऱ्यांचे जमिनीतील विहीर, बोर रेल्वे मार्गात येत असल्याने त्यावर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कसा सुटणार याविषयी अधिकारी यांना प्रश्न विचारण्यात आले. यावर रेल्वे अधिकारी यांनी महसूल विभागाकडे चर्चा करून आपण प्रश्न सोडवण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आले.

या बैठकीला महारेल्वेचे व्यवस्थापक सुनील हवालदार,सहाय्यक व्यवस्थापक सुनील कमथान,शेखर भोसले, हमीद शेख,तुषार चव्हाण, गावातील किरण ठाकर,सूर्यकांत मुंगसे,निलेश मुंगसे, बाळासाहेब मुंगसे,अनिकेत केदारी,संतोष मुंगसे, व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
