शनिवार दिनांक 14 जानेवारी 2022 रोजी पुणे ज़िल्हा सक्षम यांच्या वतीने मुळशी तालुका येथे उरावडे या ठिकाणी कोकलिया स्वरानाद या शाळेमध्ये दिव्यांग अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून मुळशी तालुका गटविकास अधिकारी संदीप जठार, सभापती बाळासाहेब चांदेरे पौड पोलीस स्टेशनचे अधिकारी देवकर साहेब, प्रांत अध्यक्ष मुरलीधर कचरे राष्ट्रीय उपाध्यक्ष अविनाश वाचासुंदर यांच्या शुभ हस्ते उदघाटन झाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष शिवाजी भेगडे यांनी सक्षम विषयी माहिती सांगून केली. या अधिवेशनात महात्मा जागृत अपंग संस्था मुळशी, तालुका अपंग संस्था साधना व्हिलेज संस्कृती शाळा मतीमंद या संस्था सहभागी झाल्या होत्या. या निमित्ताने दिव्यांगासाठी काम करणाऱ्यांनि दिव्यांग रत्न हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 2022-2023 या वर्षी खेड तालुक्यातील वराळे गावचे दिव्यांग रविंद्र काळे यांना दिव्यांग रत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रांत अध्यक्ष मुरलीधर कचरे यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट दिव्यांग सेवा केल्याबद्दल त्यांना पुरस्कार देण्यात आला.
या कार्यक्रमाला पुणे ज़िल्हा सचिव विजय पगडे, बाजीराव पारगे, ऋषी का इंदलकर, राजाराम गांधींले, कुणाल मिठागरे, शिवशंकर मुंडे, सुनील पाटील, नंदु दगडे तसेच ज़िल्ह्यातील दिव्यांग बंधू भगिनी मोठया संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आभार सक्षम चे ज़िल्हा सचिव विजय पगडे सर यांनी केले