भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री. जे.पी.नड्डा यांचा शिरूर लोकसभा मतदारसंघात लवकरच दौरा होणार असून या दौऱ्याच्या पूर्वतयारीचा आढावा आज घेतला.
जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, जिल्हा संघटन सरचिटणीस ॲड धर्मेंद्र खांडरे, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, जिल्हा परिषद शरद बुट्टे पाटील, जिल्हा परिषद आशा बुचके, तालुका अध्यक्ष शांताराम भोसले यांच्या उपस्थितीत हा आढावा घेण्यात आला. तसेच यावेळी युवा मोर्चा, महिला मोर्चाच्या नियुक्त्या जाहीर करून त्यांना नियुक्ती पत्रेही शिरूर लोकसभेच्या प्रभारी आमदार माधुरी मिसाळ यांच्या हस्ते देण्यात आली. या वेळी सर्व मतदारसंघाचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टी खेड तालुका महिला मोर्चा तालुकाध्यक्षपदी पंचायत समितीच्या माजी सभापती सौ कल्पना पाटीलबुवा गवारी यांची निवड करण्यात आली आहे. तसेच सौ ॲड.मालिनी प्रीतम शिंदे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. तसेच गणेश नाईक यांची चाकण शहर युवा मोर्चा सरचिटणीस पदी,या सर्वांचे निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष गणेश तात्या भेगडे व भाजपा शिरूर लोकसभा मतदार संघाच्या प्रभारी आमदार माधुरी मिसाळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांचे स्वागत केले आहे व पुढील राजकीय वाटचालीस कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
तसेंच खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार स्वर्गीय नारायणराव पवार यांच्या सुकन्या भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष कु.प्रिया नारायण पवार यांची भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र “कोल्हापूर ग्रामीण जिल्हा प्रभारी” पदी नियुक्ती झाली आहे त्याबद्दल त्यांचे आमदार माधुरी मिसाळ जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना पुढील संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
तसेच यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष शांताराम भोसले, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, तसेच शिरूर लोकसभा मतदार संघातील सर्व तालुकाध्यक्ष, संघटन सरचिटणीस, सरचिटणीस जिल्हा पदाधिकारी,सर्व तालुका पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.