प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- खेड तालुक्यातील हिरवेगार बागायती जमिन असलेल्या राक्षेवाडी गावातील एका शेतकऱ्याच्या मुलाने स्वतःच्या वडिलांचा वाढदिवस थाटामाटात साजरा केला आहे.गावातील प्रगतशील शेतकरी असलेल्या वडिलांचा मुलाने 72 वाढदिवस साजरा केल्याने गावात कौतुकास्पद विषय ठरला आहे.
राक्षेवाडी गावातील प्रगतील शेतकरी असलेले,श्री धोंडिभाऊ राक्षे यांचा वाढदिवस दरवर्षी 1 जानेवारीला असतो. या दिवशी नवीन वर्षाची सुरवात देखील होते.धोंडिभाऊ राक्षे यांनी जीवनात शेतीतील कष्टाच्या जोरावर,निर्व्यसनी असल्याने गेली 71 वर्ष आपला सुखी संसार सांभाळला. शेतीबरोबरच गावात नेहमी विकास कामात,सामाजिक कार्यात आपला सहभाग घेणारे आपल्या प्रेमळ, व साधे स्वभावाने गावातील लोकांची त्यांनी मने जिंकली होती.
अशा प्रगतशील शेतकऱ्याचा 72 वा वाढदिवस गावातील युवा कार्यकर्ते असलेले त्यांच्या मुलाने श्री नितीन राक्षे यांनी मोठ्या थाटात साजरा केला.आपल्या वडिलांचा समाजात असलेला मान व गावातील लोकांची जिंकलेली मने यामुळे अनेक कार्यकर्ते, मित्र परिवार, व नातेवाईक त्यांच्या वाढदिवसाला हजर होते. एका शेतकऱ्याच्या मुलाने वडिलांचा साजरा केलेला 72 वा वाढदिवस गावात चर्चा रंगवू लागली आहे.