पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे निधन झाले नंतर भारतभर शोककळा पसरली. भारतभर त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. खेड तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने देखील भाजपा कार्यालयात श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अमर बोऱ्हाडे, भाजपा खेड तालुका अध्यक्ष शांताराम भोसले, भाजपा युवा मोर्चा राजगुरुनगर शहर अध्यक्ष मयुर होले व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
दिवंगत माता हिराबेन मोदी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली व त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुचनेनुसार व आदर्शानुसार नियमित पक्ष कार्य सुरू ठेवले.
यावेळी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अमर बोऱ्हाडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत मातोश्री हिराबेन मोदी यांच्या विषयीची माहिती व भावना व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.