भागवत धर्म प्रसारक समिती, पालखी पत्रकार संघ, नामदेव समाजोन्नती परिषद व अनेक संस्थांच्या सहभागातून भागवत धर्म व वारकरी संप्रदायाचे आद्य प्रचारक संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या ७५२ व्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) ते श्रीक्षेत्र घुमान (पंजाब) भव्य रथ व सायकल वारीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर भव्य रथ व सायकल वारीचे चाकण शहरात उद्या सोमवारी दिनांक ७ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ७:३० वाजता आगमन होणार आहे.
चाकण येथे पुणे नाशिक महामार्गावरील बालाजी टायर शेजारी सचिन ॲटो कन्सल्टंट ॲन्ड मोटर्स येथे या भव्य रथ व सायकल वारीचे स्वागत करण्यात येणार आहे. सचिन ॲटो कन्सल्टंट ॲन्ड मोटर्सचे प्रो.प्रा. बाळासाहेब निखळ यांनी चाकण येथील नागरिकांना यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
यावेळी श्री संत शिरोमणी नामदेव महाराज संस्थान चाकण, नामदेव शिंपी समाज धर्मशाळा आळंदी देवाची, नामदेव शिंपी समाज युवक संघ पुणे जिल्हा, नामदेव शिंपी समाज युवक संघ उद्योग मार्गदर्शन मंडळ, नामदेव शिंपी समाज युवक संघ महाराष्ट्र राज्य सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्या वतीने या स्वागत समारंभाचे आयोजन व नियोजन करण्यात आले आहे.