प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- खेड तालुक्यातील राजगुरूनगर सहकारी बँकेच्या निवडणुकीत अखेर विद्यमान पॅनेलच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळालेला पहायला पाहायला मिळाला. विरोधी पॅनेलच्या उमेदवारांना अवघ्या 4 जागांवर समाधान मानावे लागले तर नवीन 7 जणांना सभासदांनी भरघोस मतांनी निवडून दिल्याने त्यांची संचालक पदावर वर्णी लागली आहे.
राजगुरूनगर सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या पंचवार्षिक झालेल्या निवडणुकीत विद्यमान भीमाशंकर पॅनलचे 13 उमेदवार निवडून आले आहेत. तर विरोधी राजगुरूनगर परिवर्तन पॅनेलच्या 4 उमेदवार निवडुन आले आहेत. तसेच नवीन 7 चेहऱ्यांना संधी मिळाली आहे..
राजगुरूनगर सहकारी बँकेच्या निवडुन आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे ..
किरण आहेर – 10882
गणेश थिगळे- 9959
अरुण थिगळे – 8807
सागर पाटोळे – 8659
किरण मांजरे – 8646
राहुल तांबे- 8397
राजेंद्र वाळुंज -7884
दिनेश ओसवाल- 7870
विनायक घुमटकर – 7842
राजेंद्र सांडभोर- 7242
समीर आहेर – 7192
दत्तात्रय भेगडे – 7173