स्वराज्य वार्ता प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- खेड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील शिवे गावचे सलग 15 वर्ष सरपंचपद भुषवलेले कै. महादेव धोंडिबा गडदे यांचे वयाच्या 95 व्या वर्षी अल्पशा आजाराने आज दुःखत निधन झाले. या सामाजिक कार्याचा व वारकरी संप्रदायाचा उत्तुंग कामगिरी करणारे सकाळी 8 वाजता बाबांनी या जगाचा निरोप घेतला.वारकरी संप्रदायाचे भुषण असलेल्या बाबांनी समाज काळात अखिल भामनेहेर सेवा मंडळाचे आळंदी व पंढरपूर या ठिकाणी 40 गावचे अध्यक्षपद भुषवले होते.अंत्यसंस्कारवेळी अनेक सामाजिक,राजकीय,धार्मिक, व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यांच्या पाठीमागे 2 मुले,1 मुलगी,जावई, 2 सुना व नातवंडे असा परिवार आहे. खेड पंचायत समितीचे सदस्यांची परंपरा कायम ठेवणारे आपल्या मुलांना देखील त्यांनी देऊन सामाजिक कार्याचा वसा देऊन पुढे वाटचाल करत राहिले.त्यांचे मुलगे खेड पंचायत समितीचे माजी सदस्य श्री रामचंद्र महादेव गडदे व रोहिदास महादेव गडदे यांचे ते वडील आहेत. वारकरी संप्रदायातील आळंदी व पंढरपूर या ठिकाणी खेडच्या पश्चिम पट्ट्यातील 40 गावच्या लोकांना एकत्र करून एक वारकरी मोठी संस्था बाबांनी उभी केली. एक शिवे गावच्या सामाजिक, व वारकरी संप्रदायातील विकासाचा अनमोल तारा,जेष्ठ नेतृत्व निखळल्याने गावातील नागरिकांमध्ये मोठी हळहळ व्यक्त होत आहे..
