स्वराज्य वार्ता प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- राज्यातील गरीब जनतेची दिवाळी गोड होण्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी या दिवाळीला गरीब जनतेसाठी अवघ्या शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. या घोषणेची अंमलबजावणी झाल्यानंतर राज्यातील स्वस्त धान्य दुकानावर याचे वाटप सुरू झाले.रासे गावातील स्वस्त धान्य दुकानावर देखील रविवार पासून आनंदाचा शिधा गावातील नागरिकांना वाटप करण्यात आला.

रासे गावातील सामाजिक व राजकीय मंडळींच्या हस्ते याचा शुभारंभ करण्यात आला. राज्यातील गरीब जनतेची व शेतकऱ्यांची दिवाळी गोड होण्यासाठी राज्य शासनाने साखर तेल,चनाडाळ,रवा या चार वस्तू फक्त 100 रुपयात गरीब जनतेला देण्यात येणार असल्याची घोषणा केली होतो. ह्या आनंदाचा शिधा राज्यात वाटप सुरू झाले असून गावोगावी नागरिकांना देण्यात येत आहे. रासे गावातील स्वस्त धान्य दुकानातून एकूण आलेल्या 345 किट पैकी 240 आनंदाचा शिधा आतापर्यंत नागरिकांना वाटप करण्यात आला आहे.हा आनंदाचा शिधा घेण्यासाठी गावातील नागरिकांनी मोठी गर्दी यावेळी केलेली पाहायला मिळाली तसेच शासनाने देव केलेल्या आनंदाचा शिधा घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने येत होते.अजूनही शिधा घेऊन न गेलेल्या नागरिकांना आपला आनंदाचा शिधा घेऊन जाण्याचे आवाहन केले आहे.
आनंदाचा शिधा वाटप करताना
