वेश्याव्यवसाय करवुन घेणाऱ्या महिला दलालावरती रावेत पोलीस स्टेशनची कारवाई

पुणे वार्ता :- मा. पोलीस आयुक्त श्री. अंकुश शिंदे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यानी पोलीस आयुक्तालयाच्या हदीमध्ये वेश्या व्यवसाय करण्याच्या अनुषंगाने माहिती काढून कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने अनैतिक मानवी वाहतुक विभागाने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत येश्याव्यवसाय करण्याच्या अनुषंगाने गोपनिय माहिती काढत असताना

दिनांक १९/१०/२०२२ रोजी रावेत पोलीस स्टेशन हद्दीत स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी अवैधरित्या मुलींकडुन वेश्याव्यवसाय करून घेणा-या तसेच जास्त पैशाचे अमिष दाखवून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणा-या दलालांवर कारवाई करण्यात आली आहे.

दिनांक १९/१०/२०२२ रोजी अनैतिक मानवी वाहतुक विभागातील पोलीस अधिकारी व पोलीस अमलदार यांना रायेत पोलीस स्टेशन हद्दीत पुजा असे नाव सांगुन मोबाईल वरून कॉल व व्हॉट्सअॅप कॉल करून मुलीचे फोटो पाठवून वेगवेगळ्या हॉटेल व लॉजेसवर मुलीना स्वत घेवुन जावुन त्यातील एका मुलीची निवड करण्यास सांगुन वेश्याव्यवसाय करवुन घेते अशी माहिती मिळाली होती.

अशा मिळालेल्या माहितीवरून रावेत हदीत बनावट ग्राहक पाचारण करून हॉटेल मध्ये राम बुक करुन सापळा रचला असता यातील महिला आरोपी पुजा हि तिचे सोबत दोन मुली घेवुन आली व त्यातील एक मुलींची वेश्यागमनाकरीता बनावट कस्टमर यास निवड करण्यास सांगुन त्याबदल्यात तिने वा रक्कम स्विकारली असता अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध विभागातील पोलीस अधिकारी पोलीस अमलदार व महिला पोलीस अमलदार यांनी छापा टाकून महिला आरोपी पुजा हिस ताब्यात घेवुन दोन पिडित मुलींची वेश्याव्यवसायातून सुटका केली आहे.

व्हिडिओ

सदर पिडीत मुली हया 04 नेपाळ व ०१ मुंबई येथील आहेत. महिला आरोपी पूजा हि ताब्यातुन व घटनास्थळावरुन जप्त केलेल्या मुद्देमालाचे वर्णन खालील प्रमाणे

१) ३०००/- रु. रोख रक्कम ,२) ३०/- रु किये इतर साहित्य ३) ५,०००/- रु. कि.वा. एक मोबाईल फोन जु.वा. कि.अ. असा एकुण ८,०३०/- रु कि.चा मुद्देमाल मिळुन आला

व्हिडिओ

म्हणून १) पूजा उर्फ चंदा रामनरेश विश्वकर्मा वय-२५ वर्षे, रा. सध्या ओपल इन हॉटेल, वडगाव शेरी पुणे मुळ रा. रामनरेश विश्वकर्मा, शिवशक्ती नगर न्यू ३ लिंक रोड मलिका अर्जुन जवळ, दहिसर ईस्ट, मुंबई हिवे विरुद्ध रावेत पोलीस स्टेशन येथे गुरन १०२ /२०२२ मादवि कलम ३७० (३) सह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ४. ५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास रावेत पोलीस स्टेशन करीत आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री अकुंश शिंदे सो, मा. अपर पोलीस आयुक्त श्री डॉ. संजय शिंदे खो, मा.पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. डॉ. काकासाहेब डोळे, सो, मा. सहा पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री डॉ. प्रशांत अमृतकर, सो यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील पोलीस निरीक्षक श्री. देवेंद्र चव्हाण, पोउपनि विजय कांबळे: सुपा टोके, भगवता मुठे, मारुती करडे, गणेश कारो, वैष्णवी गावडे यांनी केली आहे..

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!