मृत्यूनंतरही वेदना… स्मशानभूमीची अवस्था बिकट

प्रतिनिधी/ओम मोरे

अमरावती वार्ता :- शिरपूर येथील स्मशानभूमीची गेल्या कित्येक वर्षांपासून बिकट अवस्था झाली आहे. परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच आज मृत्यूनंतरही मृतांची अवहेलना तर नातेवाईकांना मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिरपूर येथे मृत्यूनंतरही वेदना पाठ सोडत नाही.अशी परिस्थिती आहे.

शिरपूर येथील स्मशानभूमीत पावसाळ्याच्या दिवसात अतिशय भयानक परिस्थिती बघायला मिळतो. पाऊस असला की मृतदेह अंतिम संस्कारासाठी कुठे न्यावा, कसा करावा असा कठीण प्रश्न शिरपूर येथील नागरिकांना पडतो. अशाप्रकारे मृत्यूनंतरही अंतिम संस्कार होण्यासाठी ताटकळण्याची वेळ नागरिकांवर येते. हा सगळा प्रकार मनाला दुःख देणारा आहे. मृत्यूनंतरही वेदना का सोसाव्या लागव्या, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. नव्याने सिमेंट काँक्रीटचे स्मशान शेड उभे करावे.

विकास झालेले स्मशानभूमी प्रशासनाने लवकर दुरुस्त करावे. शिवाय असे दुर्दैवी व संतापदायक प्रसंग वारंवार उद्भवू नये.म्हणून या भागातील लोकप्रतिनिधींनीही त्याकडे लक्ष द्यावे. लवकरात लवकर सदर ठिकाणी सिमेंट काँक्रीटचे दहनशेड उभारण्यात यावे, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!