दुहेरी खुनातील आरोपी ३६ तासात गजाआड , महाळुंगे पोलिसांची कामगिरी

पुणे वार्ता :- दिनांक 08/10/2022 रोजी सायंकाळी 06.30 वा. सुमारास मौजे म्हाळुंगे चौकीचे हददीतील सावरदरीगाव मध्ये भक्ती अपार्टमेंन्ट येथे इसम नामे सुरज चव्हाण व अनिकेत पवार यांचा अप अपसातील वादातून इसम नामे प्रदिप दिलीप भगत वय 21 वर्ष, रा. सावरदरी, शिवम पार्क रूम नं. 24 तिसरा मजला, ता.खेड, जि.पुणे, मुळ रा. गंभा, ता. मंगळुरपिर, जि.वाशिम याने चाकुच्या सहायाने भोकसुन खुन करून त्याचे कडील होंडा शाईन मोटार सायकल वरून पळुन गेला असल्याने म्हाळुंगे चौकी भा.द.वि.क. 302, अर्म अॅक्ट 4,27 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.

चाकण औद्योगीक परिसरात झालेल्या दुहेरी खुन हा गंभीर स्वरुपाचा असल्याने आमचे व सहायक पोलीस आयुक्त गुन्हे मार्गदर्शनाखाली, युनिट 3. कडील व.पो.नि. शैलेश गायकवाड व पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार यांना तपासकामी सुचना देवून वेगवेगळ्या टिम तयार करुन एक टिम घटनास्थळावरील परीसरात सदर आरोपीचे संपर्क असणारे त्याचे नातेवाईक मित्र यांना ताब्यातघेवून त्यांचेकडे रात्रभर चौकशी केली असता सदर आरोपी हा त्याचे मुळगावी गेला असल्याबाबत माहीती मिळाल्याने सदरची माहीती वाशिम येथे रवाना झालेल्या टिम यांना देण्यात आली.

व्हिडिओ

वाशिम येथे पाठविण्यात आलेल्या टिम मधील पोलीस हवा. आढारी, पो. ना. भोसुरे, पो.ना. भालचिम, पोशि. सुर्यवंशी यांनी सलग 12 तास प्रवास करून 600 कि.मी. अंतरावरती वाशिम येथे आरोपीचे मुळ गावी गिंभा, ता. मंगळुरपिर, जि.वाशिम येथुन आरोपीचे रहाते घरातुन आरोपीचा भाऊ नामे निलेश दिलीप भगत वय 22 वर्ष व आरोपीचा मामेभाऊ रोशन सुरेश इंगवले वय 23 वर्ष, रा. रूई ता. मानोर, जि.वाशिम यास ताब्यात विश्वासात घेउन कौशल्यपूर्वक तपास करून सदर आरोपी बाबत माहीती विचारली असता

त्याने त्याचा भाव प्रदिप भगत हा पहाटे 5.30 वा. चे सुमारास त्याचे मामाचे गावी रूई ता. मानोर जि.वाशिम येथे राजु वसंत इंगवले यांचे शेताचे तांडया मध्ये लपुन बसला असले बाबत सदर पथकास माहीती मिळाल्याने त्याचा सदर ठिकाणी शोध घेत असताना तो तेथील जंगला मध्ये पळून गेला

व्हिडिओ

त्याचा सदर तपास पथकाने त्याचा स्थानीक पोलीसांचे मदतीने जंगल परीसरात रात्रभर शोध घेवून सदर आरोपी प्रदिप दिलीप भगत वय 21 वर्ष, रा. सावरदरी, शिवम पार्क रूम नं. 24 तिसरा मजला, ता.खेड, जि.पुणे, मुळ रा. गिभा, ता. मंगळुरपिर, जि.वाशिम यास शिताफिने ताब्यात घेवून त्याचेकडे तपास केला असता सदरचा गुन्हा यातील आरोपीस यातील मयत इसम सुरज चव्हाण व अनिकेत पवार यांनी त्यांचे बिल्डींग मध्ये येण्यास विरोध केल्याचे कारणावरुन त्यांचा खुन केल्याची कबुली दिली आहे.

सदर आरोपीस रिपोर्टसह चाकण पोलीस स्टेशन अंतर्गत म्हाळुंगे चौकीचे ताब्यात देण्यात आलेले आहे.

व्हिडीओ

सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, श्री. अंकुश शिंदे, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. संजय शिंदे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. काकासाहेब डोळे, सहा पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. प्रशांत अमृतकर, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलीस उप निरीक्षक गिरीश चामले, यद् आहारी, सचिन मोरे, रूषीकेश भोसुरे, अंकुश लांडे, महेश भालचिम सागर जैनक, योगेश्वर कोळेकर, राजकुमार हनमंते, त्रिनयन बाळसराफ, राहुल सुर्यवंशी, रामदास मेरगळ, सुधिर दांगट, समिर काळे, निखील फापाळे यांनी केली आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!