चाकण पोलीस स्टेशन तपास पथकाकडुन रोहकल रोडवरील युसूफ काकर यांचे खुनाचे गुन्हयातील सहा आरोपी जेरबंद व सहा विधीसंघर्षीत बालके ताब्यात

पुणे वार्ता:- दिनांक १०/१० / २०२२ रोजी दुपारी १२ / ५० वा. चे सुमरास इसम नामे अक्षय काचोळे याने फोन वरून चाकण पोलीस स्टेशनला कळविले की, काही मुलांनी हातात कोयते घेवुन एका मुलाचे मागे पळत त्याचेवर कोयत्याने वार करून ठार मारून पळुन गेलेले आहेत.

सदर माहिती चाकण पोलीस स्टेशनला मिळताच चाकण पोलीस स्टेशन कडील वपोनि वैभव शिंगारे व इतर अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ रोहकल रोडवर धाव घेतली असता रोहकल परीसरातील बैलगाडा शर्यतीचे घाटाजवळ रोहकल रोडवर एक अनोळखी मुलावर कोयत्याने वार झाल्याने तो रक्ताचे थारोळ्यात मयत अवस्थेत पडलेला होता.

त्याचे जवळ तीन लोखंडी कोयते पडलेले होते. तसेच त्याचे पासुन काही अंतरावर खडयामध्ये रिक्षा नंबर एम एच १४ एच एम २१२४ ही दिसली. सदर घटनास्थळावर उपस्थीतीत असलेला अक्षय काचोळे यास पोलीसांनी मारेकारी इसमांबात विचारपुस केली असता त्याने अनोळखी ८ ते ९ मुले कोयत्याने वार करून घाटाचे दिशेने पळुन गेलेली आहेत असे सांगीतले.

त्यावेळी पोलीसांनी सदर रिक्षा वरून मयताची ओळख पटविली असता सदर मयताचे नाव युसूफ अर्शद काकर वय १९ वर्षे, रा. खंडोबा माळ चाकण ता. खेड जि. पुणे असे समोर आले. परंतु युसूफ काकर याचेवर कोयत्याने हल्ला करणारे इसमांबाबत काहीएक उपयुक्त माहिती घटनास्थळावर मिळाली नाही. त्यामुळे सदरचा गंभीर गुन्हा हा कोणी केला या बाबत काहीएक समजुन येत नव्हते.

त्यानंतर पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस स्टेशन कडील डी. बी… पथकाने युसूफ अर्शद काकर याचे पूर्व इतिहासा बाबत माहिती घेण्यास सुरूवात केली त्यावेळी असे समोर आले की, सप्टेंबर २०२१ मध्ये चाकण मार्केट यार्ड समोरील मैदानावर रोहित प्रभु सहाणी वय १६ वर्षे रा. चाकण याचा खुन झाला होता. सदर खुनाचे गुन्हयामध्ये युसूफ काकर याचा सहभाग होता. त्यावेळी त्याचे वय १७ वर्षे असल्यामुळे तो बालसुधार गृहातुन जामीनावर बाहेर आलेला होता.

या माहितीच्या आधारे डी. बी. पथकाने यापुर्वीचे खुनाचे गुन्हयातील मयत रोहित सहाणी याचे मित्रांची माहिती प्राप्त करून त्यांचेकडे चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी रोहित सहाणी याचा मित्र निशान बोगाती यास ताब्यात घेवुन त्याचेकडे कसून चौकशी सुरू केली तेंव्हा त्यांचेकडुन समजले की, प्रणव उर्फ पन्या संजय शिंदे, साहिल दत्ता शिंदे, आनंदा हनुमंत कोरमशेटटी, निशान देवेंद्र बोगाटी, अतुल अर्जन तांबे, रितेश परमेश्वर घोडके, यश अनिल जगताप, कुलदिप जोगदंड, कृष्णा सुनिल भंडलकर यांनी नियोजनबध पूर्व तयारी करून कट रचुन युसूफ काकर यास निशान बोगाटी व अतुल तांबे याने आंबेठाण चौक येथून २०० रूपये भाडयाने युसूफ काकर याची रिक्षा रोहकल येथे जाण्यासाठी ठरवली.

त्यावेळी उर्वरीत इसम हे रोहकल परीसरातील बैलगाडा शर्यतीचे घाटात कोयते घेतुन लपुन बसलेले होते. रिक्षा नियोजीत ठिकाणी पोहचताच अतुल तांबे याने युसूफ काकर याचे डोळयात मिरची पुड टाकली त्यावेळी रिक्षा खडडयात गेली त्यानंतर युसूफ काकर हा रोडने पळत असतांना वरील सर्वांनी मिळून युसूफ याचा पाटलाग करत त्याचेवर कोयत्याने वार करून त्यास जागीच ठार केले असल्याची माहिती मिळाली. सदर घटने बाबत मयताचा भाउ साजिद अर्शद काकर यांचे तक्रारी वरून चाकण पोलीस स्टेशन गुरनं १६०४ / २०२२ भादवि कलम ३०२, १२०(ब), ५०४, ३४ सह आर्म अॅक्ट ४/ २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदचा गुन्हा केल्यानंतर यातील आरोपी व विधीसंघर्षीत बालक यांनी चाकण परीसरातुन पलायण केले होते. चाकण पोलीस स्टेशन कडील डी. बी. पथकाने अतिषय कौशल्यपुर्ण तपास करीत सदर गुन्हयातील मुख्य आरोपीस जळगाव येथुन व इतर ठिकाणाहून असे पाच आरोपी व चार विधीसंघर्षीत बालके याना ताब्यात घेतले आहे. तर गुन्हे शाखा युनिट ३ यांनी दोन विधीसंघर्षीत बालकांना ताब्यात घेतले. तसेच गुंडा स्कॉड पिंपरी चिंचवड यांनी एक विधीसंघर्षीत बालकास ताब्यात घेतले.

तसेच सदर गुन्हयातील मुख्य आरोपी प्रणव शिंदे व आनंदा कोरमशेटटी यांना चाकण पोलीस स्टेशन कडील डी बी पथकाने जळगाव येथून अटक केलेली आहे.

व्हिडिओ

सदर गुन्हयातील मुख्य आरोपी नामे १) प्रणव उर्फ पन्या संजय शिंदे वय १९ वर्षे, २) आनंदा हनुमंत कोरम शेटटी वय १९ वर्षे, ३) निशान देवेंद्र बोगाटी वय १८ वर्षे, ४) कुलदिप संजय जोगदंड वय १९ वर्षे, तसेच व त्यांना गुन्हयात मदत करणारे आरोपी नामे ५) अशोक शंकर चव्हाण वय ३२ वर्षे, ६) अजय अंकुश कांबळे वय २४ वर्षे सर्व रा. चाकण ता खेड जि पुणे यांना अटक करण्यात आलेली आहे तसेच एकुण सहा विधीसंघर्षीत बालकांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. अशा प्रकारे एकुण १२ जनांचा गुन्हयात सहभाग असल्याचे निष्पन्न झालेले आहे.

सदर गुन्हयात एकुण सहा लोखंडी कोयते, तीन मोटार सायकली असा मुददेमाल जप्त करण्यात आलेला असुन सदर गुन्हयाचा अधिक तपास सपोनि प्रकाश राठोड हे करीत आहेत.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, श्री. अंकुश शिंदे, अपर पोलीस आयुक्त, श्री. संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ- १ श्री. मंचक इप्पर, सहा. पोलीस आयुक्त, प्रेरणा कट्टे यांचे सुचना व मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. वैभव शिंगारे तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवडे, तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. प्रसंन्न जराड, विक्रम गायकवाड, सपोफौ सुरेश हिंगे, पो हवा राजु जाधव, संदिप सोनवणे, पोना हनुमंत कांबळे, निखिल शेटे, सुदर्शन बर्डे, भैरोबा यादव, मपोना भाग्यश्री जमदाडे, पोकॉ / नितीन गुंजाळ, निखील वर्षे, अशोक दिवटे, प्रदिप राळे, सुनिल भागवत, चेतन गायकर यांनी केलेली आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!