दर्यापूर – महेश बुंदे
भारताच्या कर्तव्यदक्ष निर्णायक व जानकार तसेच बहूआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून भारतीयांना इंदिरा गांधी यांच्याविषयी प्रचंड आदर व सदभावना दिसून येते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या त्या लाडक्या सुकन्या होत. बालपणापासून त्यांना देशसेवेचे व देशप्रेमाचे बाळकडू त्या वयास मिळाले. अशा या रणसंग्रामाच्या काळात त्यांचे व्यक्तीमत्व उदयास आले.
