नवी दिल्ली : दिल्लीतल्या प्रदूषणाच्या बातम्या दिवाळीच्या ऐन सणामध्ये मोठ्या प्रमाणावर माध्यमांमध्ये येत असताना एका आरटीआय मधून एक धक्कादायक खुलासा बाहेर आला आहे.
दिल्ली सरकारने गेल्या सात वर्षांमध्ये प्रदूषण नियंत्रण हा संबंधीच्या जाहिरातींवर एक – दोन, नव्हे तर तब्बल 940 कोटी रुपये खर्च केले आहेत. पण प्रत्यक्ष प्रदूषण नियंत्रणाबाबत मात्र दोन्ही हातांनी “शंख” वाजविल्याचे दिसत आहे.!!
करोनामुळे आधीच जीवनाची धास्ती असलेल्या वृद्धआंचे आयुष्य आणखी काही वर्षांनी कमी होओ आणि जीवन विकारयुक्त होओ, इथं राज्य सरकार असूनही ती डोळ्याला झापडं लावून बसलेली आहेत.जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून राजधानी पहिला क्रमांक सोडायला तयार नाही, मग त्यामुळे कित्येकांना दमा होओ, फुफ्फुसाचे विकार होओ, श्वसनाचा त्रास होओ, शाळेत जाणाऱ्या विद्यार्थांचे आरोग्य बिघडो, करोनामुळे आधीच जीवनाची धास्ती असलेल्या वृद्धआंचे आयुष्य आणखी काही वर्षांनी कमी होओ आणि जीवन विकारयुक्त होओ, इथं केंद्र व राज्य अशी दोन सरकारे असूनही ती डोळ्याला झापडं लावून बसलेली आहेत. त्यामुळे दिल्लीकर बेजार झाला नाही, तरच नवल.
