खेड | आत्मनिर्भर भारत या संकल्पने अंतर्गत निर्मिती करण्यात आलेल्या मानवरहित बोटीची चाचणी यशस्वी

तीन रिमोटद्वारे नियंत्रित करण्यात येणाऱ्या या मानवरहित बोटींची नुकतीच डीआरडीओच्या अधिकाऱ्यांद्वारे पुण्यातील खेड तालुका या ठिकाणी भामा आसखेड धरणावर यशस्वी चाचणी करण्यात आली.

पुणे वार्ता – भारतीय संरक्षण क्षेत्रात सशस्त्र दलांची ताकद वाढविण्यासाठी संरक्षण संशोधन विकास संस्था (डीआरडीओ) आणि देशातील खासगी उद्योग व स्टार्टअप हे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत उपकरणे, शस्त्रास्त्र आणि प्रणाली विकसित करण्यावर भर देत आहेत.

याचाच एक भाग म्हणून डीआरडीओने ‘सागर डिफेन्स इंजिनिअरिंग’ या स्टार्अपच्या मदतीने मानवरहित शस्त्रास्त्रयुक्‍त बोटीची निर्मिती केली आहे.

तीन रिमोटद्वारे नियंत्रित करण्यात येणाऱ्या या मानवरहित बोटींची नुकतीच डीआरडीओच्या अधिकाऱ्यांद्वारे पुण्यातील भामा आसखेड धरणावर यशस्वी चाचणी करण्यात आली. संरक्षण मंत्रालयाच्यावतीने आयोजित ‘डिफेन्स एक्स्पो २०२२’च्या कार्यक्रमापूर्वी या चाचण्या पुण्यात घेण्यात आल्या आहेत. शस्त्रास्त्र असलेल्या या बोटींची कार्यक्षमतांचे परीक्षण करण्यासाठी ही चाचणी पुणे जिल्हा खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणाच्या जलाशयात करण्यात आली. यामुळे आता सागरी सुरक्षेच्या आणि हिंदी महासागर परिसरात देशाची क्षमता सिद्ध होणार आहे. सागरी सीमाभागात गस्त घालणे, पाळत ठेवणे, शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवत वेळेत कारवाई करण्यासाठी माहिती पोचविणे अशा सर्व बाबी या बोटींच्या माध्यमातून साध्य होणार आहेत. भविष्यात या बोटींच्या वापर केल्याने विविध कारवाईमध्ये होणाऱ्या जीवितहानी टाळली जाऊ शकते.

आत्मनिर्भर भारत या संकल्पने अंतर्गत निर्मिती करण्यात आलेल्या या मानवरहित बोटींपैकी काही शस्त्रास्त्रयुक्त बोटीमध्ये लिथियम बॅटीसह इलेक्ट्रिक प्रॉपल्शन प्रणाली उपलब्ध आहे. ही बोट समुद्रात चार तास आपली मोहीम पार पाडू शकते. सध्या ही बोट प्रती तास १० नॉटिकल मैलांपर्यंतचा प्रवास करू शकते. दरम्यान बोटीचा वेग २५ नॉटिकल मैलांपर्यंत वाढविण्यासाठी काम सुरू आहे, असे डीआरडीओच्या वतीने सांगण्यात आले आहे.

बोटीवर कोणीही मनुष्य नसल्यामुळे, व्हिडीओ फीड ग्राऊंड कंट्रोल स्टेशनवर केलं गेलं. अनेक गोष्टीवर पाळत ठेवण्यासाठी ही बोट उपयुक्त राहिल असं DRDO संशोधनग्रुप डायरेक्टर पी.एम. नाईक म्हणाले. ही बोट टोही आणि गस्त घालण्यासाठी उपयुक्त आहे. कोणत्याही बंडखोरीच्या वेळी बोटीवर शस्त्रेही बसवली जाऊ शकतात. आमच्या टीमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आम्ही सध्या भामा आसखेड धरणावर याची चाचणी घेत आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

पुण्यातील स्टार्टअपचा सहभाग –

देशाची सागरी सीमा पाहता सागरी सुरक्षा अधिक सक्षम करण्यावर संरक्षण मंत्रालयाद्वारे प्रयत्न करण्यात येत आहेत. ही सुरक्षा सुनिश्‍चित करण्यासाठी नौदल आणि तटरक्षक दलाद्वारे हिंदी महासागरात अनेक मोहिमा राबविण्यात येत आहेत. या मोहिमांसाठी मानवरहित बोटी उपयुक्त ठरतील. या मानवरहित बोटींच्या निर्मितीसाठी डीआरडीओ समवेत पुण्यातील एका स्टार्टअपने मोलाची भूमिका बजावली आहे. पुण्यातील सागर डिफेन्स इंजिनिअरिंग या स्टार्टअपद्वारे या बोटीची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे देशाच्या संरक्षणासाठी भरीव योगदान दिले जात असल्याने ही पुण्यासाठी अभिमानाची बाब ठरत आहे.

मानवरहित बोटीचे वैशिष्ट्य –

डीआरडीओची ही मानवरहित बोट इलेक्ट्रिक आणि मोटर इंजिनवर चालते आणि एका वेळी पाण्यात 24 तास सतत गस्त घालू शकते. 

– बोटीचा वेग १० नॉटिकल मैल प्रती तास

– वेगवेगळ्या प्रकारांमध्ये या बोटी उपलब्ध

– प्रत्येक प्रकाराची कार्यक्षमता वेगळी

– देशाच्या सागरी सीमेत प्रवेश करणाऱ्या शत्रूवर नियंत्रण कक्षात बसूनच रिमोटच्या आधारे रोखणे शक्य

– यातील विशेष तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शत्रूच्या ताब्यात आल्यास या बोटीतील नियंत्रण फलक आपोआप नष्ट होईल

यामुळे शत्रूला कोणत्याही प्रकारचा डेटा किंवा माहिती मिळणार नाही

-रडार यंत्रणेच्या मदतीने पाळत ठेवण्याव्यतिरिक्त ही बोट पाणबुडीविरोधी युद्ध आणि माईन्स काऊंटर मेसरमध्ये देखील काम करु शकते. DRDO च्या सहकार्याने सागर संरक्षण अभियांत्रिकी नावाच्या कंपनीने विकसित केलेले हे पूर्णपणे भारतात तयार केले आहे. पाळत ठेवणारे कॅमेरे आणि शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असलेली ही मानवरहित बोट एकदा समुद्रात सोडली की ती रिमोट, संगणक आणि उपग्रहांद्वारे दूरस्थपणे नियंत्रित केली जाईल. पाण्यावर तरंगणाऱ्या या बोटीच्या भोवतालच्या 1 किलोमीटरच्या 360 अंश दृश्य नियंत्रण कक्षात बसून टेहाळता येणार आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!