पिंपरी चिंचवड | वेश्याव्यवसाय करवुन घेणाऱ्या दलांलावरती हिंजवडी पोलीस स्टेशनची कारवाई

पिंपरी चिंचवड वार्ता:- प्रतिनिधी बापूसाहेब सोनवणे

अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध विभागाने ०४ पिडित मुलींकडुन स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी जास्त पैशाचे अमिष दाखवुन वेश्याव्यवसाय करवुन घेणाऱ्या दलांलावरती कारवाई केलेबाबत.. “

मा. पोलीस आयुक्त श्री. अकुंश शिंदे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांनी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये वेश्या व्यवसाय करण्याच्या अनुषंगाने माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने

अनैतिक मानवी वाहतूक विभागाने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये वेश्याव्यवसाय करण्याच्या अनुषंगाने गोपनिय माहिती काढत असताना दिनांक ०७/१०/२०२२ रोजी प्रिया उर्फ पुजा असे नाव सांगुन मोबाईल वरुन कॉल करुन त्या मोबाईल वरुन मुलीचे व्हॉट्सअॅपव्दारे फोटो पाठवून मुलींची निवड करण्यास सांगुन वाकड, हिंजवडी परीसरात तिचा साथीदार याचे मदतीने त्याचे लाल रंगाचे स्विफ्ट कारने हॉटेल, लॉज व फार्म हाऊस या ठिकाणी मुलींना सोडुन मुलींकडुन वेश्याव्यवसाय करून घेतात.

अशा अशायाची माहिती मिळाली होती. अशा मिळालेल्या माहितीवरून हिंजवडी पोलीस हद्दीत कस्तुरी चौक, संत तुकाराम मंगल कार्यालयासमोर सार्वजनिक रोडवर बनावट ग्राहक यास पाचारण करून पडताळणी करुन सापळा रचुन छापा टाकुन लाल रंगाचे स्विफ्ट कारमधुन ०१ आरोपी यास ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातील लाल रंगाची स्विफ्ट कार व ०४ पिडीत मुलींची वेश्याव्यवसायातून सुटका करण्यात आली असून पिडीत मुलींपैकी ०१ उत्तरप्रदेश ३ महाराष्ट्रातील आहेत.

पहा कारवाईचा व्हिडिओ

आरोपीच्या ताब्यातून जप्त केलेल्या मुद्देमालाचे वर्णन खालील प्रमाणे.

१) ३०००/- रु रोख रक्कम

२) १०० /- रु किं चे इतर साहित्य

३) ९,०००/- रु. कि.चा एक मोबाईल फोन जु.वा.कि.अं. ४) ४००/- रु किं. चे ०१ पेनड्राईव्ह जु.वा. कि. अ.

५) ६,००,०००/- रु किं ची स्विफ्ट कार एमएच १२ टीएन २३८९ जु.वा. कि. अं.. असा एकुण ६,१२,५००/- रु कि.चा मुद्देमाल मिळुन आला आहे

यात आरोपी १) ऋषिकेश राजाराम पांगारे वय २४ वर्षे, रा. बालेवाडी स्टेडियम, स्वीमींग पुल समोर, हिंजवडी पुणे मुळ पत्ता- डी. बी. पवार चौक, सम्राट अशोक चौक, रमाबाई कॉलनी, घाटकोपर मुंबई महिला आरोपी २) पुजा उर्फ प्रिया तानाजी कुचेकर वय ३२ वर्षे, रा. श्रीनिवास संकुल सोसा, फ्लॅट नंबर-५०३, रायगड कॉलनी, न्यु अहिरेगाव वारजे माळवाडी, पुणे यांचे विरुद्ध हिंजवडी पोलीस स्टेशन येथे गुरन ९६४ / २०२२ भादवि कलम ३७० (३) ३४ सह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ४, ५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास हिंजवडी पोलीस स्टेशन करीत असुन वरील दोन आरोपीना अटक केलेली असुन आरोपी यांस दिनांक ११/१०/२०२२ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. अंकुश शिंदे सो मा अपर पोलीस आयुक्त श्री. डॉ संजय शिंदे सो, मा. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे), श्री. डॉ. काकासाहेब डोळे सो. मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री. डॉ. प्रशांत अमृतकर सो यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षातील पोलीस निरीक्षक श्री देवेंद्र चव्हाण, पोउपनि (श्रेणी) विजय कांबळे, पोलीस अमलदार कल्याण महानोर, सुनिल शिरसाट, सुधा टोके, मारुती करचुडे, गणेश कारोटे, भगवंता मुठे, संगिता जाधव, रेश्मा झावरे, सोनाली माने यांनी केली आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!