प्रतिनिधी फुलचंद भगत:-
वाशिम:-मानोरा तालुक्यातील गव्हा येथे विकासकामांच्या नावावर दिवसाढवळ्या महाकाय वृक्षांची दिवसाढवळ्या कत्तल होत असुन प्रशासन माञ चुप्पी साधुन असल्याचे दिसते.महसुल प्रशासन तसेच वनविभागाने याविषयी चौकशी करुन दोषींवर कायदेशिर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.
संपुर्ण जगात कोरोणाने हाहाकार माजवला होता अशातच आॅक्सीजन अभावी हजारोंचे जीव गेले.या पार्श्वभुमीवर मानवि जिवनात आॅक्सीजनचे कीती महत्व आहे हे सर्वांनाच ऊमगले.यासाठी प्रशासनासोबतच सामाजिक संघटनांनी वृक्षारोपन आणी वृक्षसंवर्धनाला अधिक महत्व देवुन झाडे लावन्याची मोहिम सुरु केली.दशकोटी वृक्षलागवडीसारखे स्तुत्यपुर्ण ऊपक्रमही केंद्रसरकारने राबवून सर्वांना पर्यावरण संवर्धनाचे महत्व पटवुन दिले.कोरोनाकाळात तर या झाडांचे मानवि जीवनात कीती महत्व आहे ते सर्वांच्या लक्षात आणून दिले.
