तालुका अध्यक्ष मानकर यांनी घेतली संपकर्ते कर्मचाऱ्यांची भेट
दर्यापूर प्रतिनिधी महेश बुंदे
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या दर्यापूर आगारातील चालक, वाहक व यांत्रिकी पदांवर कार्यरत कर्मचाऱ्यांनी आज दिनांक ७ नोव्हेंबर पासून बेमुदत संप पुकारले आहे.
दरम्यान आज रोजी भाजपा तालुका अध्यक्ष माणिकराव मानकर यांच्या नेतृत्वाखाली शहर व ग्रामीण पदाधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली व भारतीय जनता पार्टीचा या संपाला पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले. यावेळी प्रामुख्याने माजी तालुका अध्यक्ष विजय मेंढे, माजी शहराध्यक्ष अनिल कुंडलवाल, शहराध्यक्ष नाना माहुरे, अतुल गोळे, संजय कांबे, निलेश गावंडे, मनोज नावडकर, कमलेश भट्टड, पराग दंडवते, दिनेश पारडे, दिनेश धुराटे, यासह मोठ्या प्रमाणावर रा. प. कर्मचारी उपस्थित होते. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष माणिकराव मानकर यांनी संपाला पाठींबा जाहीर करून भाजप आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही संपकरी कर्मचाऱ्यांना दिली.