अमरावती प्रतिनिधी जयकुमार बुटे:-
अमरावती वार्ता :- दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा नवीन सार्तुणा नगर या ठिकाणी तुळजाभवानी मंदिरा जवळ नवरात्र उत्सव साजरा करण्यात आला मागील दोन वर्षापासून कोवीड मुळे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला नव्हता
परंतु यावर्षी हा मोठा उत्साहाने साजरा करण्यात आला त्यामध्ये परतवाडा रोड असलेले आष्टीगाव मधील भजन मंडळी उपस्थित होते व त्यांच्या ढोल ताशा मध्ये उपस्थित नागरिकांनी मनःपूर्वक आनंद घेतला त्यानंतर आज 7 तारखेला महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
सार्तुणा परिसरातील आजूबाजूचे नगरातील लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला परंतु काही वेळेनी पावसाचा जोर वाढला असल्यामुळे भक्तगणांची धावपळ झाली तरीसुद्धा महाप्रसाद घेण्याची गर्दी होती व काही वेळानंतर पाऊस थांबल्यावर पुन्हा महाप्रसाद घेण्याची गर्दी वाढली हे विशेष आज हजारो संख्येने या ठिकाणी तुळजाभवानी मातेचा महाप्रसाद घेण्यात आला
