चाकण वार्ता :- महिलेचा खून करून मृतदेह निर्जनस्थळी पुरल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (दि.6 रोजी उघडकीस आला आहे.
सदर मिसींग व्यक्ती बाबत संशय बळावल्याने सदर मिसींगची चौकशी डि. बी. पथकाचे सपोनि विक्रम गायकवाड यांचेकडे देवुन सदर मिसींग बाबत तपास पथकाचे सपोनि प्रसन्न ज-हाड, सपोनि श्री. विक्रम गायकवाड व तपास पथकास सखोल चौकशी करण्याचे आदेश वपोनि श्री. वैभव शिंगारे यांनी दिले होते.
मात्र, पोलिस तपासात हा खून पतीने व महिलेच्या सासऱ्याने केल्याचे उघड झाले असून तपास पथकाचे सपोनि प्रसंन्न ज-हाड, सपोनि विक्रम गायकवाड, पोलीस नाईक हनुमत कांबळे, पोलीस अमलदार प्रदीप राळे यांनी सदर मिसींगचे खबर देणार गोरक्ष बबन देशमुख यास ताब्यात घेवुन त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे देवुन वारंवार घटनेची व घटनास्थळाची विसंगत माहिती देत असल्याने

गोरक्ष देशमुख याचेवर तपास पथकाचा अधिकचा संशय बळावला त्यामुळे त्याचेकडे अधिक सखोल विचारपुस केली असता त्याने त्याची पत्नी अशा हिचा बाहेर पुरषाशी अनैतीक संबंध असल्याचे तिचे चारीत्रवर संशय घेवुन त्या कारणावरून तीला जिवे ठार मारण्याचे ठरविले.
त्याकरीता त्याने त्याचे ओळखीचा रोशन गजानन भगत उर्फ रॉकी यास विश्वासात घेवुन माझी बायको आशा ही चुकीची वागत असुन असे चुकीची माहिती सांगुन तीला ठार मारण्यासाठी त्याबदल्यात त्याला एक लाख रूपये सुपारी देण्याचे ठरविले. रॉकी यांने त्यासाठी चाकण येथील त्याचे साथीदार देवा व मुंढे असे दोन साथीदारांना सोबत घेवुन दिनांक २८/०८/२०२२ रोजी सायंकाळी आळंदी घाटाचे जंगलामध्ये अधिच खड्डा घेवुन गोरख याने साथिदारांचे मदतीने दिनांक २९/०८/२०२२ रोजी रात्री ०२/०० वा. चे सुमारास पत्नी आशा हिचा राहते घरात दोरीने गळा आवळुन तीचे तोंडावर उशी दाबुन तीस ठार मारून तीचे प्रेत गोरक्ष व रॉकी यांनी गोरक्ष याचेकडील स्कुटीवर ठेवुन घेवुन जावुन आळंदी घाटात आधिच खणुन ठेवलेल्या खड्ड्यामध्ये पुरले आहे. अशी गंभीर व धक्कादायक माहिती सांगीतली.

चाकण पोलिसांनी पतीसह दोघांना अटक केली आहे तर दोन जण अद्याप फरार आहेत.आशा गोरक्षनाथ देशमुख वय वर्ष 35 (सध्या रा. बोरजाईनगर, मेदनकरवाडी, ता. खेड, मूळ रा. श्रीगोंदा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
तपास पथकातील सपोनि विक्रम गायकवाड व पथकाने आरोपी रोशन गजानन भगत यास चाकण परीसरातुन तर सपोनि प्रसंन्न जराड व पथकाने देवानंद गजानन मनवर यास म्हसवड सातारा येथे जावुन सापळा लावुन ताब्यात घेतले आहे.
सदर गुन्हयात आरोपी १) गोरक्ष बबन देशमुख, वय ३५ वर्षे, रा. मेदनकरवाडी ता. खेड जि. पुणे, २) रोशन गजानन भगत उर्फ रॉकी वय २० वर्षे रा. मेदनकरवाडा मुळ रा. रूई ता. मानोरा जि. वाशीम, ३) देवानंद गजानन मनवर वय २४ रा. वाडा ता. मानोरा जि. वाशीम, ४) बबन शिवलींग देशमुख वय ६२ वर्षे रा. पडेगाव ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर यांना अटक करण्यात आलेली असुन सदर आरोपींनी गुन्हयाची कबुली दिलेली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास हा अनिल देवडे पो.नि (गुन्हे) हे करीत आहेत. पोलिसांनी वरील आरोपींना अटक केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गोरक्ष याने 29 ऑगस्ट रोजी इतर आरोपींच्या सहाय्याने पत्नीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर चाकण आळंदी रस्त्यावरील वन विभागाच्या जंगलात तो नेऊन पुरला. पुढे त्याने स्वतः वर संशय येवू नये यासाठी पोलीस ठाण्यात जाऊन पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दिली.
पुढे गोरक्षनेच 1 ऑक्टोबर रोजी प्रेत खड्ड्यातून बाहेर काढले व जाळले. मात्र, पाऊस पडत असल्याने प्रेत अर्धवट जळाले. त्यानंतर त्यांनी ते प्रेत फॉरेस्ट शेजारच्या तळ्यात फेकून दिले. परिसरात दुर्गंधी पसरताच पोलिसांना याची खबर मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व प्रेत उत्तरीय तपासणीसाठी पाठवले. यावेळी गळा आवळून खून झाल्याचे तपासणी रिपोर्टमध्ये येताच पोलिसांनी पतीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा कबुल केला. पत्नीवरील अनैतिक संबंधाच्या संशयातून हा खून केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
