अमरावती वार्ता :- प्रतिनिधी जयकुमार बूटे – मेळघाट प्रादेशिक वनविभागाच्या उपवनरक्षक कार्यालयातर्फे विभागस्तार्यावर वन्यगुन्हे विषयक कार्यशाळा ऑनलाईन नुकतीच पार पडली. या कार्यशाळेत दी कुलाकासा फाउंडेशनचे अध्यक्ष अँड. उदय देशमुख यांनी शंभरावर वनाधिकारी व कर्मचाऱ्यांना करताना कायदेशीर तरतुदी विषयक माहिती दिली.
मेळघाट प्रादेशिक वनावृत्तातर्फे विभागस्तरावर पुढील शंभर दिवसांमध्ये प्रामुख्याने करण्यात येणाऱ्या नियोजित कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने परिक्षेत्र स्तरावर विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे मेळघाट प्रादेशिक वन्य विभागाकरिता विषयक कार्यशाळा व्हीसीद्वारे आयोजित करण्यात आली होती .
या कार्यशाळेत क्षेत्रात स्तरावरील अधिकारी कर्मचाऱ्यांना अँड उदय देशमुख यांनी मार्गदर्शन केले त्यांना कायदेविषयक तरतुदीची माहिती देऊन आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी तपासादरम्यान कोणती काळजी घेतली पाहिजे कुठल्या बाबी टाळल्या पाहिजे. तपासा कुठल्याबाबीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे त्यासाठी कुठल्या परिणामकारक कलमाचा वापर केला पाहिजे संकलित करताना काय काळजी घेतली पुरावाची वैधता कशी तपासली पाहिजे आदी बाबीची यावेळी अँड उदय देशमुख यांनी माहिती दिली तसेच वनाधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रश्नांची उत्तरे यांनी देऊन त्यांच्या शंकांचे निरासन केले आभाशी पद्धतीने पार पडलेल्या कार्यशाळेत विभागातील शंभरहुन अधिक वन अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते हे विशेष.
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
जयकुमार बुटे