लोणीकंद पोलीस तपास पथकाची उल्लेखनिय कामगिरी

पुणे वार्ता :- लोणीकंद पोलीस स्टेशन, पुणे शहर यांची लोणीकंद पोलीस तपास पथकाची उल्लेखनिय कामगिरी रेकॉर्ड वरील आरोपीकडुन ०२ पिस्टल व ०५ जिवंत काडतुस जप्त याबाबत सविस्तर माहिती पुढील प्रमाणे

दिनांक २९/०९/२०२२ रोजी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सपोनि गजानन जाधव, तपास पथकातील पोलीस नाईक जाधव, पोलीस नाईक साळुंक, पोलीस नाईक साळवे, पोलीस शिपाई ढोणे, पोलीस शिपाई लोहार असे मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शो यांचे आदेशाने नवरात्र उत्सवानिमित लोणीकंद पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अमलदार स्वप्निल जाधव व पोलीस अंमलदार कैलास साळुंके यांना केरानंद थेऊर रोडवरील कोलवडी माळवाडी येथील ज्योतीबा मंदिराजवळ पिवळया रंगाचा फुल बाहयांचा टी शर्ट व निळया रंगाची जिन्स पॅन्ट घातलेल्या एक मुलगा पिस्टल विक्री करण्यासाठी येणार असलेबाबत खात्रीशिर बातमी मिळाल्याने

नमुद बातमीचे ठिकाणी मा. गजानन पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे कारवाई करुन आरोपी नामे शुभ्रत बाळासाहेब बनसोडे, वय २२ वर्ष, रा. आदर्श कॉलनी, अण्णासाहेब मगर कॉलेज जवळ, हडपसर, पुणे यारा ताब्यात घेवुन त्याचेकडुन ०२ देशी बनावटीचे पिस्टल व ०५ जिवंत काडतुस जप्त करण्यात आलेले असून आरोपीस अटक करण्यात आलेली आहे.

पुढील तपास पथकात श्री. गजानन जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक हे करीत आहेत. सदरची कामगिरी मा. श्री. नामदेव चव्हाण सो, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग. पुणे शहर, मा. श्री रोहीदास पवार सो, पोलीस उपआयुक्त सो, परिमंडळ ४ पुणे शहर, मा. श्री. किशोर जाधव गो. सहा. पोलीस आयुक्त सो, येरवडा विभाग, पुणे शहर, मा. श्री. गजानन पवार गो परिष्त पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर मा श्री मारुती पाटील सां, पोलीस निरीक्षक (गुन्हे). लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर यांचे मार्गदर्शना खाली तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक गजानन जाधव, पोलीस अंमलदार बाळासाहेब सकाटे, स्वप्निल जाधव, विनायक साळवे, कैलास साळुंके, सागर जगताप, अजित फरांदे, अमोल ढोणे, पांडुरंग माने, साईनाथ रोकडे, दिपक कोकरे, आशिष लोहार यांनी केली आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!