पिंपरी चिचंवड पोलीस आयुक्तालया अतंर्गत चाकण पोलीस ठाणे हददीमध्ये मोठया प्रमाणात औदयोगिक क्षेत्र असल्याने अज्ञात व्यक्तिंकडुन मोटारसायकल चोरी होत होत्या. मोटारसायकल चोरीबाबतचे गुन्हे उघड करण्याच्या सुचना मा. श्री. अंकुश शिंदे साो, पोलीस आयुक्त, पिपंरी चिचंवड यांनी श्री. वैभव शिंगारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चाकण पोलीस स्टेशन यांना दिल्या होत्या. श्री. वैभव शिंगारे वरीष्ठ पोलीस निरीक्षक चाकण पोलीस स्टेशन यांनी वाहन चोरांकडुन चाकण पोलीस ठाणे हददीतील गुन्हे उघडकरण्या बाबत तपास पथकाचे अधिकारी व अमंलदार यांना आदेशित केले होते. तपासपथकाचे सपोनि प्रसन्न जन्हाड व विक्रम गायकवाड तसेच तपास पथकातील अमंलदार हे वाहन चोरीच्या घटनास्थळावर भेट देवुन सदर परिसरातील सी सी टि व्ही फुटेज गोळा केले. तसेच गोपनिय बातमीदार व तांत्रिक तपासाचा वापर करून मोटारसायकल चोरीच्या आरोपींचा शोध घेत होते.
दिनांक १३/०८/२०२२ रोजी तपास पथकाचे सपोनि श्री. प्रसंन्न जराड, सपोफौ सुरेश हिंगे, पोलीस नाईक हनुमत कांबळे, पोलीस अमंलदार प्रदीप राळे, निखिल वर्षे हे मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड करण्याकरीता पोलीस ठाणे हददीत पेट्रोलिंग करीत असताना वपोनि श्री वैभव शिंगारे व तपास पथकास बातमी मिळाली की, रेकॉर्ड वरील आरोपी नामे अशोक मधुकर सोनवणे रा. राळेगण थेरपाळ ता. पारनेर जि. अहमदनगर तसेच फारूक अन्सार पठाण रा. चाकण ता. खेड जि पुणे व योगेश प्रकाश वटांबे रा. बालाजीनगर चाकण ता. खेड जि. पुणे हे मोटारसायकल चोरी करीता साबळेवाडी व मेदनकरवाडी, चाकण परिसरात येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यातील आरोपी नामे अशोक सोनवणे हा भोसे, चाकण येथील चोरीची मोटारसायकल घेवुन फिरत असताना त्यास तपास पथकाकडील पेट्रोलिंग करीत असलेल्या अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सापळा लावुन तपास पथकाने ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्या नतंर सदर आरोपीकडे अतिशय कौशल्यपूर्ण तपास केला असता रेकॉर्डवरील आरोपी अशोक सोनवणे याने यापूर्वी वेळोवेळी चाकण पोलीस ठाणे व इतर पोलीस ठाणे हददीतुन चोरी केलेल्या एकुण १९ हिरो होंडा कंपनीच्या स्प्लेन्डर व स्प्लेन्डर प्लस मोटारसायकल काढुन दिलेल्या आहेत. तसेच अटक केल्या नतंर सदर आरोपीकडे कौशल्यपूर्ण तपास केला करून आरोपी नामे फारूक अन्सार पठाण रा. चाकण ता. खेड जि पुणे व योगेश प्रकाश वटांबे रा. बालाजीनगर चाकण ता. खेड जि. पुणे यांनी चाकण परिसरातुन चोरलेल्या स्प्लेन्डर प्लस, टि व्ही एस अपाचे, मॅस्ट्रो अशा एकुण ६ मोटारसायकली काढुन दिलेल्या आहेत.