स्वराज्य वार्ता प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा जोपासत आलेल्या खेड पंचायत समितीच्या सभापती सौ वैशालीताई गणेश जाधव यांच्या मुलाच्या श्रीदादा गणेश जाधव याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज रासे गावातील अंगणवाडी लहान मुलांना शालेय साहित्य भेट म्हणून देण्यात आले.त्यामुळे वैशालीताईंनी पुन्हा एकदा सामाजिक कार्याची ओळख घालून दिली.

रासे गावातील अंगणवाडी शाळेतील 20 मुलांना यावेळी शालेय साहित्य भेट म्हनुन देण्यात आले आहे. यामध्ये मुलांना शालेय ड्रेस,शुज, व दप्तर यावेळी देण्यात आले.यावेळी झालेल्या कार्यक्रमाला रासे गावच्या प्रभारी ग्रामसेवक श्रीमती नीलिमा जाधव, व रासे ग्रामपंचायतीच्या सदस्य सौ श्वेता मुंगसे यांच्या हस्ते मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाला अंगणवाडी लहान मुलांच्या पालकांनी महिलांनी हजेरी लावली होती.

अत्यंत आनंदात पार पडलेल्या या कार्यक्रमात शालेय वस्तू भेट मिळाल्याने मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.तसेच या कार्यक्रमाचे नियोजन अंगणवाडी शिक्षिका श्रीमती झिंजूरके मॅडम, व सेविका सुतार यांनी अत्यंत छान केले होते.
