नांदगाव खंडेश्वर/ओम मोरे
स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवाच्या अवचित्तावर हर घर तिरंगा 13 ते 15 ऑगस्ट या काळामध्ये राबविणार जाणार आहे नागरिकांनी घरो घरी तिरंगा लावावा. याकरिता नांदगाव खंडेश्वर शहरातील नगरपंचायत कार्यालयात हे ध्वज शासकीय दरात नागरिक व व्यापारी करिता उपलब्ध होणार आहे. तसेच नांदगाव खंडेश्वर शहरातील नागरिकांना तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांना नगरपंचायत कडून SELFIE with तिरंगा स्पर्धेचा आयोजन करण्यात आलेले आहे. सेल्फी विथ तिरंगा स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय व तृतीय येणाऱ्या स्पर्धकांना प्रशस्त पत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धकांनी सेल्फी काढून श्री शरीफ शेख 8483937129, अभिजीत लोखंडे 7021228387 या व्हाट्सअप नंबर वर पाठवावे. यावेळी कार्यालय अधिकारी लोंढे नम्रता देशपांडे, पाणीपुरवठा अभियंता अभिजीत लोखंडे, शरीफ शेख,आशिष ढवळे, प्रमोद राऊत,गजानन चांदणे, संजय जाधव, बाबाराव शेगोकार तसेच महिला बचत गटाच्या महिला प्रमुख्याने उपस्थित होत्या.