हिरकणी महिला ग्राम संघाचा पुढाकार..
नांदगाव खंडेश्वर/ओम मोरे
75 वा आजादीच्या अमृत महोत्सवानिमित्त संपूर्ण देशभरात 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यात येत आहेत. क्रांती दिनाच्या अवचित साधून हिरकणी महिला ग्राम संघाच्या वतीने राष्ट्रीय ध्वज विक्रीचा शुभारंभ सुद्धा करण्यात आला. त्यानंतर राष्ट्रध्वज हाती घेऊन महिलांमार्फत संपूर्ण गावांमध्ये प्रभात फेरी काढण्यात आली. राष्ट्रीय ध्वज सोबत मोफत मध्ये प्रत्येकाला वृक्ष वाटप सुद्धा करण्यात आला. निसर्ग संवर्धनाचा हेतू लक्षात घेऊन हिरकणी महिला ग्राम संघाच्या वतीने. 75 वा आजादी चा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. तसेच पर्यावरण अभ्यासक ओम मोरे यांनी मोफत वृक्ष उपलब्ध करून दिले. यावेळी संपूर्ण गावातील महिला बचत कटाच्या महिला. हिरकणी महिला बचत गट तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.