नांदगाव खंडेश्वर/ ओम मोरे तालुक्यातील जावरा मोळवण येथून बेंबळा नदी वाहते. या नदीला पूर आला. ट्रॅक्टर चालकाला पुलावरून जाता येईल, असं वाटलं. त्यामुळं त्यानं पाच जण ट्रॅक्टरवर असले असताना ट्रॅकर पुलावरून काढला. पण, पुराच्या पाण्यामुळं त्याला पुलाचा अंदाज आला नाही. पुलाला कठडे नव्हते. त्यामुळं ट्रॅक्टरचा तोल नदीत गेला. ट्रॅक्टर बुडताना पाहून दोन जण कसेतरी बाहेर पडले. पण, तीन जणांचा अद्याप पत्ता लागला नाहीनांदगाव खंडेश्वर तालुक्यात बेबळा नदीत ट्रॅक्टरसह 5 जण वाहून गेले. 2 जण वाचले 3 जण अद्यापही बेपत्ता आहेत. पुलावरुन पाणी वाहत असतानाही ट्रॅक्टर घालणे जीवावर बेतले. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जावरा मोळवण दरम्यानची घटना आहे. अक्षय रामटेके (Akshay Ramteke) रा. पळसमंडक, नारायण परतीकी, पळसमंडक या दोघांना बाहेर काढण्यात आल्या. सुरेंद्र डोंगरे (Surendra Dongre), रा. पळसमंडक, शेषराव चावके व मारोती चावके (Maroti Chawke) हे दोघेही धर्मापूर येथील रहिवासी वाहून गेले. या तिघांचा शोध घेण्यात आला. पण, पत्ता लागू शकला नव्हता. अशी माहिती तलाठी राठोड यांनी दिली.