- सावनेर येथील नाल्यावरील पुल गेला वाहून
नांदगाव खंडेश्वर/ ओम मोरे
आठ दिवसाच्या खंडानंतर नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पावसाने पुन्हा संततधार सुरुवात केली. त्यामुळे सोयाबीन, तूर, कपाशी या पिकांना जोरदार फटका बसलाय आहे तर सावनेर येथील नाल्यावरील पुल वाहून गेला तर
संततदार पावसामुळे अनेक घरांची पडझड झाली व पानबसन शेतामध्ये पाणी साचल्याने पिके जळून गेली आहेत.
रविवारपासून अचानक संततदार पावसाला सुरुवात झाली व त्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे तेव्हा तालुक्यातील सावनेर येथे पांदण रस्ता मधोमध असलेल्या नाल्यात वरचा पूल पुरामुळे वाहून गेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्या येण्याची समस्या उभी राहिली आहे तर आठ दिवसाच्या पावसाच्या उघाडीनंतरही जमिनी ओल्याच होत्या. त्यात पावसाने पुन्हा सुरुवात केल्याने मशागतीचे कामे पुन्हा खोळंबली आहेत. बैल जोड्यांची संख्या अगोदरच कमी झाल्याने डवऱ्याच्या पाळ्या बसल्या नाहीत.
तणनाशकाचा असर महिनाभरानंतर कमी झाला आहे. त्यामुळे शेतात नवे तन उगवून पिकाला व्यापून टाकत आहे. “तन खाते धन” ही शेतकऱ्यांची म्हण असून तनाचा बंदोबस्त करने हे शेतकऱ्यासमोर नव्याने आव्हान ठरले आहे. शेतकऱ्यांना पुन्हा तन नाशकाचा खर्च करण्याची वेळ येऊ शकते.
मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीचे अद्यापही पंचनामे करण्यात आले नाहीत. सरकारचाच ठावठिकाणा नसल्याने शेतकऱ्यांना कोणीही वाली उरला नाही.
अतिवृष्टीच्या नुकसानी बाबत पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याबाबत तातडीने कारवाई करावी व ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
—-_————————–+++++—————————-
पांदन रस्त्यावरील नाल्यावर असलेला पूल रविवार रात्रीपासून सुरू झालेल्या संततदार पावसामुळे वाहून गेला आहे त्यामुळे आम्हाला शेतात जाण्यास दुसरा मार्ग नाही तेव्हा शासनाने तातडीने या नाल्यावरील पूलाचे बांधकाम करून आम्हाला न्याय द्यावा सुधीर भडके शेतकरी सावनेर