शनिवार दिनांक 6 ऑगस्ट 2022 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र शेलपिंपळगाव येथे डोळे तपासणी शिबिर घेण्यात आले.
प्राथमिक आरोग्य केंद्र शेलपिंपळगाव आणि ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र वाय सी एम हॉस्पिटल पिंपरी यांचे सौजन्याने सदरचे शिबिर राबवण्यात आले.

या शिबिराचा लाभ सुमारे 125 रुग्णांनी घेतला डोळ्यांच्या विविध आजारांचे निदान व उपचार या शिबिरात करण्यात आले.
या शिबिरात वाय सी एम हॉस्पिटल पिंपरीचे अधिष्ठाता डॉ. वाबळे सर पी.एस्.एम. विभागाचे प्रमुख डॉ. पांडवे आणि नेत्ररोग विभाग प्रमुख डॉ. रूपाली आमले महेशगौरी हे उपस्थित होते.
या शिबिराचे आयोजन वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे, डॉ. साईनाथ मानकरी यांनी केले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र शेलपिंपळगाव सर्व कर्मचारी आणि आशा स्वयंसेविका यांनी शिबिर नियोजनात मोलाची भूमिका बजावली.
