अमरावती/ ओम मोरे
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यासाठी अमरावती येथील सांस्कृतिक भवन येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात शहरातील महाविद्यालय, मनपा शाळा, शिक्षण संस्था आणि शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच दिनांक १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत हर घर तिरंगा हा उपक्रम यशस्वी राबविण्यासाठी नियम पाळण्यात यावे असे सुचना देखील देण्यात आले आहे. अमरावती महागरपालिका व जिल्हा डाक घर यांच्या माध्यमातून लावण्यात आलेल्या तिरंगा स्टॉलचे उद्घाटन डॉ. प्रविणजी आष्टीकर साहेब मनपा आयुक्त अमरावती यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर मनपा उपायुक्त भाग्यश्री बोरेकर, अती. आयुक्त श्री. हर्षल गायकवाड, सहा. आयुक्त श्री. नरेंद्र वानखेडे, शिक्षण आधिकरी डॉ. अब्दुल रजिक, डॉ. राजेश बुरंगे संचालक-राष्ट्रीय सेवा योजना, प्रा. डॉ. राजकुमार दासरवाड-कार्यक्रम अधिकारी-राष्ट्रीय सेवा योजना, प्रा. शिवाजी तूप्पेकर सह-कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना, समाजकार्य महाविद्यालय बडनेरा व अमरावती शहरातील इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.