अमरावती/ ओम मोरे
विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटी द्वारा संचालित समाजकार्य महाविद्यालय बडनेरा अमरावती येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. जसे रॅली, पथनाट्य, हर घर तिरंगा, वृक्ष लागवड, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, आणि देशभक्तीपर गीतावर नृत्य अशा विविध उपक्रम घेण्यात येणार आहे. या उपक्रमात समाजकार्य महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. टी. एस. राठोड, यांची उपस्थिती राहणार आहे. राष्ट्रीय सेवा योजना चे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. राजकुमार दासरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपक्रम होणार आहेत. तसेच सह-कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक शिवाजी तुपेकर आणि महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. अनिता पाटील यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे. तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी श्री. विनोद गोळे, श्री. रुपेंद्र आत्राम, श्री. हर्षल इंगोले इत्यादी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक कु. निकिता उंबरकर, प्रतीक कोकाटे, ऋषिकेश शहाकार, कु. प्रांजल कुऱ्हाडे, यश बेरड, कु. प्राची इंगोले, कु. वेदांती खंडारे, कु. साक्षी काटोलकर, आर्यन वाघमारे, यश असतकर, राहुल आवारे, कु. तन्वी भिवगडे, कु. अक्षता शेवतकर, प्रज्वल ठोसर, कु. सुरभी धवस, कु. तनिषा वाघमारे इत्यादी विद्यार्थांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करण्यात सहभाग घेणार आहेत.