सिद्धार्थ सेवा प्रतिष्ठान,मातंग एकता आंदोलन म. फुले नगर चाकण,चाकण नगरपरिषद चाकण,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या वतीने चाकण शहरात विविध ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती पुष्पहार अर्पण करून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.सर्वप्रथम बुद्धविहार म.फुले नगर चाकण या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

बुद्धविहार मध्ये कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती रतनबाई गालफाडे व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून चाकण नगरीचे माजी उपसरपंच तसेच भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री कालिदासदादा वाडेकर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रसंगी खेड तालुका भाजपचे तालुका सरचिटणीस ऍड प्रीतम शिंदे ,सिद्धार्थ सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री.गौतम वाव्हळ,उपाध्यक्ष श्री.सुनील गोतारणे,म.फुले नगर विकास मंचाचे अध्यक्ष श्री.चंद्रकांत बचुटे, रिपब्लिकन श्रमिक सेना तालुका अध्यक्ष श्री.संदेश झाडे,आर.पी.आय.ज्येष्ठ नेते श्री.पोपटशेठ घनवट,

आर।पी.आय.व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्री.सचिन वाघमारे, अनुसूचित जाती/जमातीचे तालुका उपाध्यक्ष श्री.तानाजी लोखंडे, श्री.कैलास कुचेकर,श्री.मनोहर आगरकर, श्री.विलास कुचेकर,श्री.सचिन गालफाडे,ऍड.अमर साळवे,श्री.विठ्ठल चांदणे, श्री.अजय हिरवे,श्री.बाळासाहेब गायकवाड, श्री.हरेश बनसोडे,श्री.लहू बचुटे, श्री.संतोष हजारे,श्री.अजमेरभाई शेख,श्री.गुलाब पवार,कु.शीतल लोखंडे, श्री.प्रेम जगताप इ.मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी मातंग एकता आंदोलन म.फुलेनगर चाकण या नामफलकाचे उद्घाटन श्री.कालिदासदादा वाडेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.या वेळी शहरात विविध ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

या निमित्ताने म.फुलेनगर मधील असंख्य महिला व पुरुष तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी व नेते उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या वेळी चाकण पोलीस स्टेशन चे श्री.रोहिदास मोरमारे साहेब यांनी चोख बंदोबस्त ठेवला.श्री.कालिदासदादा यांनी त्यांचे विचार मांडताना संदेश दिला की अण्णाभाऊ साठे यांची जयंती फक्त म.फुलेनगर परिसरापूरती मर्यादित न राहता संपूर्ण शहरात साजरी व्हावी व त्यांच्या विचारांचा वसा आणि वारसा सर्वदूर पसरावा असे मत व्यक्त केले.