नांदगाव खंडेश्वर/ ओम मोरे.
औरंगाबाद महामार्गावर नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिंगणापूर फाट्यावर दोन ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी आहे गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. दोघाचे मृत्यूदेह ट्रक मधून काढण्यात पोलिसांना यश आले असून एक व्यक्ती गंभीर आहे त्यावर नांदगाव खंडेश्वर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे तर अपघातानंतर सुमारे वीस ते बावीस किलोमीटरच्या रांगा लागलेले होत्या त्या तब्बल तेरा तासानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
शिंगणापूर फाट्यावरून पाचशे मीटर अंतरावर आर जे 04 जीसी 2258 क्रमांकाचा ट्रक नागपूरकडून औरंगाबाद कडे जात होता तर सीजी 04 एच झेड 8154 क्रमांकाचा ट्रक औरंगाबाद कडून नागपूरकडे जात होता. मात्र या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे असल्याने खड्डा वाचवण्याच्या प्रयत्नात दोन ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात झाला
एका ट्रकमध्ये सलाखी इतर दुसऱ्या ट्रकमध्ये कांदे होते, मात्र दोन्ही ट्रकची समोरासमोर भीषण धडक झाल्याने दोन ट्रक मधील दोघांचा अंगावरून आर-पार सलाखी गेल्यात यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून एक व्यक्ती जखमी आहे , रात्री उशिरा पोलिसांना माहिती मिळतात पोलीस रात्रीपासूनच घटनास्थळी दाखल झाले मात्र दोन्ही ट्रक रस्त्यावर आडवे झाल्याने या ठिकाणी सुमारे दहा ते वीस किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली होती ती वाहतूक तब्बल तेरा तासानंतर सुरळीत करण्यात आली व त्यासाठी महानगरपालिका अमरावती यांच्याकडून अग्निशामक व जेसीबी याचे पाचारण करून ट्रकमध्ये फसलेल्या दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले असून अद्यापही तीन जणांचे मृत्यू झाला आहे तर 1 व्यक्ती गंभीर जखमी असल्याने त्याच्यावर नांदगाव खंडेश्वर ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरू आहे पोलीस शर्तीचे प्रयत्न केले व तब्बल 13 तासांनी अद्यापही मृत्यूदेह काढण्यात पोलिसांना यश आले नाही घटनास्थळी वाहतूक सुरळीत करण्यासाठी नांदगाव खंडेश्वर, मंगरूळ चव्हाळा, बडनेरा व तळेगाव दशासर येथील पोलीस घटनास्थळी आहे,तर मृत्यूक झालेल्या न मध्ये किशोर मगना वय 25 वर्ष रा. दुडिया राजस्थान, प्रेमप्रकाश रुगाराम वय 30 वर्ष रा.सरली राजस्थान ,सर्वेशकुमार झल्लासिग वय 35 वर्ष रा. घनश्यामपूर उत्तर प्रदेश, तर जखमी कुलदीप सुरेशसिंग वय 24 वर्ष रा. शिराठू उत्तर प्रदेश आहे याच्यावर ग्रामीण रुग्णालय नांदगाव खंडेश्वर रुग्णालय येथे उपचार सुरू आहे
औरंगाबाद ते नागपूर या या महामार्गावर शिंगणापूर जवळ असलेल्या पुलावर खड्डा पडला व तो खड्डा वाचताना दोन्ही ट्रकचा अपघात झाला त्यामुळे या महामार्गावर असलेला खड्डा तातडीने बुजवावा अशी परिसरातून मागणी होत आहे.
औरंगाबाद नागपूर या रस्त्यावर रात्री अकरा ते बाराच्या दरम्यान झालेल्या झालेल्या अपघातामुळे नागपूर व औरंगाबाद कडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूला 20 ते 25 किलोमीटर तब्बल तेरा तास वाहनांच्या रांगा लागून होत्या ते त्यासाठी ट्रक मधील मृतदेह काढण्याकरिता दहा ते बारा तासाचा अवधी लागला व त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
ट्रक मधील मृतक शरीर काढण्याकरिता अमरावती महानगरपालिकेच्या अग्निशामक व आणीबाणी वाहक गाडीचा व दोन क्रेन एक जेसीबी च्या साह्याने काढण्यात आला तेव्हा रस्त्यावरील सुरळीत करण्याकरिता नांदगाव खंडेश्वर मंगरूळ चव्हाळा देवगाव व बडनेरा येथील वाहतूक पोलिसांनी युद्ध स्तरावर प्रयत्न केले.
————————————-+—+——-——————-
नागपूर औरंगाबाद महामार्गावर झालेल्या अपघातात मृतकांचे शरीराची ओळख करून रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. तब्बल तेरा तासांनी औरंगाबाद नागपूर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. त्याकरिता पोलीस प्रशासनाने युद्ध स्तरावर प्रयत्न केले व शिंगणापूर फाट्यावर गतिरोधक नसल्यामुळे अपघाताचे हे ठिकाण ठरत आहे API एस. ए. चव्हाण सपोनी नांदगाव खंडेश्वर
–—–+—————————————————————-
आमदार प्रताप अडसड यांनी अपघात स्थळी पाहणी करून नागपूर औरंगाबाद महामार्गावरील तातडीने दुरुस्ती करावी असे फोन करून प्रकल्प अधिकारी NHAI यांना आदेश यावेळी दिले. ———————————————————————
नागपूर औरंगाबाद या महामार्गाचे या रस्त्याचे दुरुस्तीचे काम पावसाळ्यामुळे रखडले होते करण्यात येईल याकरिता आमदार महोदयांनी निवेदन देऊन तातडीने काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे तेव्हा शिंगणापूर चौफुलीवर ब्रेकर व रस्त्याची दुरुस्ती तातडीने करण्यात येईल असे डॉ. अरविंद काळे प्रकल्प संचालक NHAI औरंगाबाद यांनी सांगितले.