स्वराज्य वार्ता प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे:- उद्योजक जगातील महत्त्वाचा समजला जाणारा “व्यवसाय उत्कृष्ट पुरस्कार ” हा रासे गावातील एका उद्योजकाला जाहीर झाला आहे. अत्यंत कठीण परिस्थितीत मात करून उद्योजक जगात आपली ओळख निर्माण करणारे रासे गावातील श्री संतोष चंद्रकांत मुंगसे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या 6 तारखेला नाशिक येथे होणाऱ्या विविध मान्यवरांच्या हस्ते होणाऱ्या सोहळ्यात हा पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे.


रासे गावातील उद्योजक श्री संतोष चंद्रकांत मुंगसे यांनी आमदार मसाले या व्यवसायाच्या माध्यमातून उद्योजक जगतात ठसा उमटवला होता. या त्यांच्या व्यवसायामुळे त्यांनी गेली 4 5 वर्ष आपल्या व्यवसायची वेगळी ओळख निर्माण केली होती. तसेच मार्केटिंग, कामगारांना रोजगार, कुशलता, व जिद्दीच्या जोरावर आपला आमदार मसाले चा एक ब्रॅण्ड बाजारात उपलब्ध केला. या त्यांच्या व्यवसायाची दखल घेऊन उद्योजक जगतातील महत्त्वाचा समजला जाणारा “व्यवसाय उत्कृष्ट 2022 पुरस्कार” हा त्यांना जाहीर झाला आहे. त्यामुळे खेड तालुक्यातील रासे गावातील एवढे उद्योजक असताना एका उद्योजकाला मिळालेला सन्मान नक्कीच इतरांना प्रेरणादायी ठरला आहे.