खरपुडी खुर्द येथे नागपंचमी पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आली त्या प्रसंगी गावातील महिलांनी वारुळाची पुजा करुन फेर फुगडी असे विविध खेळ खेळत सनाचा आनंद घेतला. पश्चिमेकडील संस्कृतीने आकर्षित होऊन व पारांपारिक संस्कृती यांविषयी समाजात पसरवले जाणारे नकारात्मक विचार यामुळे नागपंचमी सारखे सन संपुष्टात येत आहेत. खरपुडी खुर्द गावातील नागपंचमी सनामुळे नविन पिढीला असे पारंपारिक स्वरूप पहायला मिळत आहे.